ऐरोलीत तरुणीची आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज (फोटो सौजन्य-X)
सावन वैश्य, नवी मुंबई: ऐरोली सेक्टर 1 मध्ये एका तरुणीने सकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली होती. नंदिनी तिवारी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीच नाव असून ती मूळ कानपुर ला रहायला होती. नंदिनी की कामानिमित्त ऐरोलीत गेल्या तीन महिन्यापूर्वी पिजी मध्ये रहायला होती. तिच्या सोबत राहणाऱ्या मैत्रिणी सुट्टीत गावी गेल्यावर तिने गळफास घेत आत्महत्या केली.
ऐरोली येथे एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना तपासाअंती तिच्याजवळ एक सुसाईड नोट सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ऐरोली सेक्टर 1 येथील ओंकार हाईट्स सोसायटीमध्ये पेईंग गेस्ट मध्ये राहणाऱ्या नंदिनी तिवारी नामक एका 22 वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरातच कपड्याच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुणी विप्रो येथील आयटी पार्क मध्ये काम करीत असून तिच्या सोबत आणखी 3 मुली पेईंग गेस्ट मध्ये वास्तव्यास होत्या. परंतु सुट्टी असल्याने इतर मुली आपापल्या घरी निघून गेल्या होत्या. सकाळी दरवाजा उघडत नसल्याने 12 वाजताच्या सुमारास पोलीसांना कळविण्यात आले असता हा प्रकार उघडकीस आला.
मूळची कानपुरची असलेली नंदिनी ही आर्थिक अडचनामुळे नैराश्यजीवन जगत होती. त्यातच घरात एकटी असलेल्या या तरुणीने हे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आत्महत्येपूर्वी तिनी सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिने विविध कारणे नमूद केली आहेत. नंदिनी ही आर्थिक विवंचने होती असं तिच्या मैत्रिणीचं म्हणणं आहे. तर नंदिनीच्या पालकांनी सुसाईड नोट वरच आक्षेप घेतल्याने रबाळे पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवली असून सहाय्यक निरीक्षक वृषाली पवार या अधिक तपास करत आहेत.
घरात पाहणीवेळी तिची डायरी मिळून आली आहे. त्यात मिळणारा पगार व गरजा यांची सांगड जमत नसल्याची खंत तिने लिहिली असल्याचे महिला सहायक पोलिस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितले. या आर्थिक अडचणीमुळे नैराश्य आल्याने पुन्हा कानपूरला जाणार असल्याचे तिने मैत्रिणीकडे बोलून दाखवले होते. आर्थिक अडचण, अपेक्षाभंग यातून तिने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. याबाबत तिच्या कुटुंबीयांना कळविले असून ते आल्यानंतर अधिक गोष्टी स्पष्ट होऊ शकतील.