crime (फोटो सौजन्य: social media)
सोलापूर : सोलापुरातून एक धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे. तुमचे देव सैतान आहेत, त्यांना पाण्यात टाकून आमचे धर्म सेवीकारा. आम्ही तुम्हाला १० हजार रुपये देऊ असे अमिश दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या एका कथित फादर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कथित फादरचे नाव रवी फादर (५५ वर्षीय) असे आहे.
चर्च केले होते तयार
मिळालेल्या माहितीनुसार, रवी फादर याने सोलापुरातील सेटलमेंट परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये चर्च तयार केले होते. तिथे त्याने महिलांना सांगितले की, “तुमचे देव सैतान आहेत, आणि ते तुमचे कल्याण करणार नाही. त्यांना पाण्यात टाकून आमचे देव स्वीकारा. आम्ही तुम्हाला १० हजार रुपये देऊ असे अमिश दाखवले.
महिलांचा आरोप काय?
२० जुलैला रवी फादरने महिलांना वाईन सारखं लाल रंगाचा पेय आणि ब्रेड खाण्यासाठी दिले, असा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर संबंधित महिलांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. यानंतर सलगर वस्ती पोलिसांनी कथित रवी फादर विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.
पुन्हा चड्डी गॅंग सक्रिय! काळा टी-शर्ट, तोंडाला कपडा, हातात घरफोडीसाठी लागणारं सामान आणि…
सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. घरफोडीच्या उद्देशाने ‘चड्डी गँग’ पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर शहरातील वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी या परिसरांमध्ये चार संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आलं आहे. या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेले असून काळा टी-शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली होतो. त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारं सामान देखील असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास चार चोर चेहऱ्याला कपडा पूर्णपणे बांधून काळा टी-शर्ट आणि चड्डीवर फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य असल्याचे स्पष्ठपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. या गंगाकडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलविल्या गेल्याचंही निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ पावलं उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.