
तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला
हिंगोली : सेनगाव येथे उसनवारीचे 10 हजार रुपये परत मागितल्याच्या कारणावरून एका तरुणावर तलवार आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलागर येथील शेकुराव गडदे यांनी बोरकर नावाच्या व्यक्तीला 10 हजार रुपये उसनवारीवर दिले होते. पैसे परत मागितल्यानंतरही बोरकरने टाळाटाळ केल्याने गडदे सेनगाव येथे येत असताना येलदरी टी-पॉईंटवर दिलीपसिंग, गौतम जाधव आणि रोशन उर्फ गोलू कुन्हे यांनी त्यांची कार आडवी केली. बोरकरकडून पैसे का मागितले, असा पवित्रा घेत तिघांनी गडदे यांच्याशी शिवीगाळ केली आणि वाद चिघळत जाताच दिलीपसिंगने तलवारीने त्यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.
हेदेखील वाचा : Pune Crime: संतापजनक! पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शाळेत सोडतो म्हणत…
दरम्यान, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गडदे यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. पुन्हा सेनगावात आलास तर जिवे मारू, अशी धमकी देत तिघे आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी गडदे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल
तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम जाधव आणि रोशन कुन्हे यांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी दिलीपसिंग फरार आहे. पुढील तपास उपनिरीक्षक खंदारे करीत आहेत.
पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याला धमकावले
दुसऱ्या एका घटनेत, पिस्तुलाचा धाक दाखवून 20 लाख रुपये लुटून नेल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. याप्रकरणी सराईत गुंड आशिष कुबडे उर्फ बोमाविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोमाने व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर पिस्तूलाचा धाक दाखवून २० लाख रुपये मागितले. पैसे मिळाले नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली
हेदेखील वाचा : Nashik Crime: ७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर केले सहा महिने अत्याचार, चिमुकलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत…