नेमकं काय घडलं?
आरोपीचे नाव मुनाकिब नासिर अन्सारी असे आहे. मुनाकिब हा महाविद्यालयीन विध्यार्थी असून त्याची आणि पीडित मुलीची ओळख काही दिवसांपूर्वीच एक बॅस्टोपवर झाली होती. त्यांनतर त्याने ४ डिसेंबरला तिला शाळेत सोडतो असे म्हणत तिला आपल्या दुचाकीवर बसवले. मात्र शाळेत न नेत, आरोपी तिला एका खोलीत घेऊन गेला आणि तेथे जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.
आरोपी अटकेत
आरोपीने अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला आहे. कुटुंबीयांनी तात्काळ विश्रांतीवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपीचा शोधला सुरुवात केली. पोलिसांनी काही क्षणातच अटक केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, पुण्यात सतत गुन्हेगारी वाढत आहे. मारहाण, हत्या, चोरी, दहशत माजवणे, अत्याचार अश्या अनेक प्रकारच्या घटना समोर येत आहे. आता पुण्यात पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोध्रातील टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका; तिघांना ठोकल्या बेड्या
राजगुरूनगरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुजरातमधील गोध्रा येथील दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी संशयास्पद टेम्पो ताब्यात घेऊन तिघांना अटक केली आहे. दोन जण पळून गेले आहेत. खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेने होलेवाडी परिसरात ही कारवाई केली आहे.
Nagpur Crime: नोकरीच्या आमिषाने विवाह, नंतर छळ आणि…, नागपूरमध्ये महिला कबड्डीपटूने संपवले आयुष्य
Ans: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात.
Ans: मुनाकिब नासिर अन्सारी, महाविद्यालयीन विद्यार्थी.
Ans: तक्रारीनंतर आरोपीला शोधून अटक केली आणि गुन्हा दाखल केला.






