नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. पीडित चिमुरडी केवळ ९ वर्षाची आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे घडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात लाट पसरली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डोंगराळे येथील ३ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती. आता पुन्हा नाशिक जिल्ह्यात ९ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले आहे.
कसे केले अत्याचार?
संशयित आरोपीचे नाव नामदेव गुंजाळ (७५) असे आहे. गेल्या सहा महिन्यापासून तिच्यावर अत्याचार सुरु होते. ती चिमुकलीला पैसे, चॉकलेट असे आमिष दाखवत एका जागेवर नेत या संशयित आरोपी वारंवार अत्याचार केले. पोलिसांनी या संशयिताला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच संतापात नागरिकानी सटाणा पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. या घटनेने सटाणा तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.
नाशिकमध्ये हळहळ! घरात एकटी असताना 10 वर्षीय मुलीने घेतला गळफास
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे.नाशिकरोडच्या सामनगाव येथे एका 10 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली याचे कारण समोर आलेले नाही आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई वडील कामावर असतांना…
आत्महत्या करणाऱ्या १० वर्षीय मुलीचे आई- वडील हे मोल मजुरीचे काम करतात. दोघे आई वडील हे रोजगारासाठी मोल मजुरी करण्यासाठी गेले होते. यावेळी राहत्या घरात नॉयलॉनच्या दोरीच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास घेत १० वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मुलीचे आई- वडील घरी पोहोचले. तिच्या वडिलांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेने परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे.
मुलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. नाशिकरोड पोलिसांनी ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Nagpur Crime: नोकरीच्या आमिषाने विवाह, नंतर छळ आणि…, नागपूरमध्ये महिला कबड्डीपटूने संपवले आयुष्य
Ans: सुमारे सहा महिन्यांपासून आरोपीकडून वारंवार अत्याचार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Ans: आरोपीवर पोस्को कायदा आणि संबंधित IPC कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे
Ans: घटनेनंतर परिसरात संताप उसळला आणि नागरिकांनी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली






