
Pune Murder: पुण्यनगरीत दिवसाढवळ्या बाजीराव रोड रक्तरंजित; तरुणाची निर्घृण हत्या, कायदा-सुव्यवस्थेचे धाबे दणाणले
पुण्यनगरीत दिवसाढवळ्या तरुणाचा मृत्यू
पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
काहीच दिवसांपूर्वी कोंढव्यात झालेली हत्या
Pune Crime News: पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील गर्दी असलेल्या रस्त्यावर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाजीराव रोड हा पुण्यातील वर्दळ असणारा महत्वाचा रस्ता समजला जातो. वर्दळीच्या ठिकाणी बाजीराव रोडवर एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. आरोपीने तरूणावर शस्त्राने वार केले आणि तिथून पळून गेल्याचे मथले जात आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जखमी झालेल्या तरुणांचे नाव मयंक असल्याचे समजते आहे. या हल्ल्यात तो जखमी झाला असल्याचे समोर आले आहे. त्याचे वी 17 वर्षे असण्याची शक्यता आहे. भरदिवसा तरूणावर हल्ला झाल्याने शहरात कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट
कोंढव्यात झालेला खून वनराज आंदेकरच्या खूनाचा दुसरा बदला म्हणूनच घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी आता बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वारज आंदेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तत्पुर्वी गोळ्या व कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
Ganesh Kale Murder : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर
अमन शेख (वय २२), अरबाज अहमद पटेल (२४) मयूर वाघमारे (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात गणेश किसन काळे (वय ३०, रा. येवलेवाडी) याचा खून झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, आमीर खान, स्वाराज वाडेकर, अमन शेख, अशा ९ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत किसन धोंडीबा काळे यांनी तक्रार दिली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण, पोलिस हवालदार विशाल मेमाणे व त्यांच्या पथकाने केली.