Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांच्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या? कुटुंबीयांचा आरोप, पोलीस स्टेशनचे ते पोलीस कोण?

न्हावी येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने चौकशीदरम्यान पोलिसांच्या मारहाणीमुळे ही आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2025 | 03:56 PM
Youth commits suicide due to beating during interrogation at Shirval police station

Youth commits suicide due to beating during interrogation at Shirval police station

Follow Us
Close
Follow Us:

शिरवळ : भोर तालुक्यातील न्हावी येथील एका तरुणाने पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय तुकाराम शिंदे (वय २२, रा. न्हावी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, कुटुंबीयांनी शिरवळ पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान निर्घृण हत्येत झाले. बुधवारी रात्री ११:३० वाजता एका कंपनीच्या गेटजवळ अमर शांताराम कोंढाळकर (वय २२, रा. वडवाडी, ता. खंडाळा) याची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तेजस महेंद्र निगडे (वय १९, रा. गुणंद, ता. भोर) याला शिरवळ पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, त्यानंतर ती कोठडी तीन दिवसांसाठी वाढवण्यात आली. या घटनेचा तपास शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप करत आहेत.

चौकशी साठी अन्य तरुणांना….

या हत्येच्या चौकशीदरम्यान, आरोपीसोबत कंपनीत काम करणाऱ्या इतर तरुणांची देखील पोलिसांकडून चौकशी केली जात होती. त्यात अजय तुकाराम शिंदे यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. सोमवारी (दि. १७) अजय आपल्या कुटुंबासोबत शिरवळ पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र, पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत जबर मारहाण केली. मारहाणीनंतर त्याचे हात-पाय सुजले होते. संध्याकाळी सात वाजता त्याला सोडण्यात आले आणि पुढील दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मारहाणीच्या भीतीमुळे अजयने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजारील नागरिकांनी याची माहिती मिळताच कुटुंबीयांना सांगितले. त्याला तातडीने भोर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर कुटुंबीय आक्रमक झाले असून, पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि दबावामुळेच अजयने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अमरावतीमध्ये  लैंगिक अत्याचार पीडित मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 15) नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालावरून ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यावरून अत्याचाराचा प्रकारही उघडकीस आला. अत्याचारातून गर्भधारणा झाल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शहाणे यांच्या तक्रारीवरून रविवारी (दि. 16) अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका 15 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती शनिवारी (दि. 15) सायंकाळी नांदगाव पेठ पोलिसांना मिळाली. पीडित मुलगी ही राहत्या घरी बेडरूममध्ये पंख्याला स्टूलच्या मदतीने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली.

Web Title: Youth commits suicide due to beating during interrogation at shirval police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Shirval

संबंधित बातम्या

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन
1

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन

नवऱ्याचं बाहेर लफडं, बायकोनं प्रेयसीला पकडलं अन्…; भर रस्त्यात अपहरणाचा थरार
2

नवऱ्याचं बाहेर लफडं, बायकोनं प्रेयसीला पकडलं अन्…; भर रस्त्यात अपहरणाचा थरार

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक
3

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

प्रफुल्ल लोढाच्या अडचणी आणखी वाढल्या, महिलेचे गंभीर आरोप; बावधन पोलिसांनी घेतले ताब्यात
4

प्रफुल्ल लोढाच्या अडचणी आणखी वाढल्या, महिलेचे गंभीर आरोप; बावधन पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.