Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Kanpur-Delhi Daily Train: भारतीय रेल्वेने कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान दररोज धावणाऱ्या नवीन ट्रेनला मंजुरी दिली आहे. गाडी क्रमांक 14153 कानपूर सेंट्रलहून रात्री 8:40 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 4:50 वाजता आनंद विहारला पोहोचेल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 27, 2026 | 03:25 PM
Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कानपूर सेंट्रल-आनंद विहार दरम्यान रोजची नवी रात्रीची ट्रेन सुरू.
  • 14153 रात्री 8:40 ला कानपूरहून सुटणार; सकाळी 4:50 ला आनंद विहारला पोहोचणार.
  • अलकापुरी येथे ₹166.5 कोटींच्या चार पदरी रोड ओव्हर ब्रिजलाही मंजुरी.
रात्री झोपा आणि सकाळी दिल्लीला पोहोचा, असा प्लॅन करताय का? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेने कानपूर ते दिल्लीसाठी एक नवीन रोज धावणारी ट्रेन सुरू केली आहे. गुरुवारी रेल्वेने कानपूर सेंट्रल ते आनंद विहार या नवीन डेली ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमुळे कानपूर, इटावा, अलीगढ, गाझियाबाद आणि दिल्लीमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल. या रूटवर आधीच खूप गर्दी असते, त्यामुळे ही नवीन ट्रेन गर्दी कमी करेल. Kanpur-Delhi Daily Train:

ट्रेनची वेळ काय आहे?

रेल्वेने सांगितल्यानुसार, गाडी नंबर 14153 कानपूर सेंट्रल – आनंद विहार मेल कानपूरहून रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी आनंद विहारला पोहोचेल. परत येताना गाडी नंबर 14154 आनंद विहार – कानपूर सेंट्रल मेल आनंद विहारहून रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी कानपूरला पोहोचेल. ही गाडी एकूण 428 किलोमीटरचा प्रवास करेल.जाताना 8 तास 10 मिनिटं लागतील आणि येताना 8 तास लागतील. रात्रीचा प्रवास असल्यामुळे दिवस वाया जाणार नाही.

Cyclone Arnab : ‘अर्नब’ चक्रीवादळाचा हाहाकार; नद्या-नाले तुडूंब, अनेक गावांचा संपर्क तुटला

कोणत्या स्टेशनवर थांबणार?

ही ट्रेन फक्त कानपूर ते दिल्लीच नाही तर मधल्या महत्वाच्या स्टेशनवर पण थांबणार आहे. त्यामुळे त्या भागातल्या लोकांना पण फायदा होईल. ही नवीन ट्रेन फाफुंद, इटावा, टुंडला, हाथरस, अलीगढ, खुर्जा, दादरी आणि गाझियाबाद या स्टेशनवर थांबेल. ही सगळी मोठी स्टेशन आहेत आणि तिथे रोज खूप लोक प्रवास करतात.

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

रेल्वेचं म्हणणं आहे की,या डेली मेलमुळे कानपूर आणि दिल्लीमधलं कनेक्शन अजून मजबूत होईल. लोकांना रात्री प्रवास करायला एक चांगला पर्याय मिळेल आणि दिवसभर काम करून रात्री प्रवास करता येईल.आणखी एक मोठं काम पण मंजूरया ट्रेन सोबतच रेल्वेने अजून एका कामाला मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागात अलकापुरी इथे चार पदरी रोड ओव्हर ब्रिज म्हणजे उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्यासाठी एकूण 166.5 कोटी रुपये खर्च येणार आहे.यात रेल्वेचा वाटा 83.27 कोटी असेल आणि राज्य सरकारचा वाटा पण 83.27 कोटी असेल. खर्च दोघं मिळून करणार आहेत. या पुलामुळे तिथली वाहतूक कोंडी कमी होईल.एकंदरीत, कानपूर-दिल्ली प्रवास करणाऱ्यांसाठी ही नवीन ट्रेन एकदम फायद्याची ठरणार आहे. रोजची ट्रेन असल्यामुळे तिकीट मिळायला पण सोपं जाईल.

Web Title: Kanpur anand vihar daily night train 14153 14154 timetable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • delhi
  • Indian Railway
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू
1

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू
2

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
3

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
4

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.