Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Navbharat Viksit Bharat Leadership Conclave 2026’ मध्ये डिजिटल क्रांतीचा रोडमॅप; सुधांशू त्रिवेदी-प्रतापराव जाधव मांडणार भूमिका

'नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव 2026'मध्ये डिजिटल परिवर्तन, तंत्रज्ञान आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत सुधांशू त्रिवेदी आणि प्रतापराव जाधव डिजिटल क्रांतीचा रोडमॅप मांडत विविध धोरणात्मक मुद्द्यांवर आपले विचार मांडणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2026 | 03:38 PM
'नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव 2026'मध्ये डिजिटल क्रांतीचा रोडमॅप; सुधांशू त्रिवेदी-प्रतापराव जाधव मांडणार भूमिका

'नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव 2026'मध्ये डिजिटल क्रांतीचा रोडमॅप; सुधांशू त्रिवेदी-प्रतापराव जाधव मांडणार भूमिका

Follow Us
Follow Us:

Navbharat Viksit Bharat Leadership Conclave 2026 From Policy to Progress: भारताला 2047 पर्यंत पूर्णतः विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्याच्या संकल्पाला गती देण्यासाठी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे 7 जुलै 2026 रोजी ‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव 2026’ या महत्त्वपूर्ण परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. भीकाजी कामा प्लेस येथे होणाऱ्या या कॉन्क्लेवमध्ये विकसित भारताच्या दिशेने डिजिटल परिवर्तन, आधुनिक पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि सुशासन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा होणार आहे.

विकसित भारताच्या दृष्टीकोनावर मंथन

नवभारत नवराष्ट्र मीडिया ग्रुप आयोजित या कॉन्क्लेवमध्ये देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि मान्यवर एकत्र येणार आहेत. भारताला जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल इनोव्हेशन, समावेशक विकास आणि प्रभावी प्रशासन या विषयांवर विविध सत्रांमध्ये सखोल विचारमंथन होणार आहे.

‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह’ मध्ये महिला नेतृत्वावर विशेष …

आरोग्य, धोरण आणि लोकशाही व्यवस्थेवर विशेष सत्र

परिषदेतील विशेष सत्रामध्ये आरोग्य सेवा, राष्ट्रीय धोरण आणि लोकशाही व्यवस्था या विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आयुष मंत्री प्रतापराव जाधव आयुष क्षेत्राचा विस्तार, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या आगामी योजना आणि उपक्रमांची माहिती देणार आहेत.

तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य डॉ. सुधांशू त्रिवेदी भारताची बदलती राजकीय दिशा, जागतिक स्तरावरील वाढता प्रभाव आणि भविष्यातील धोरणात्मक निर्णयांबाबत आपले विचार मांडणार आहेत.

याशिवाय दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता विधिमंडळातील सुधारणा, पारदर्शक प्रशासन आणि लोकशाही उत्तरदायित्व अधिक मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर भाष्य करणार आहेत.

डिजिटल क्रांती आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर विशेष भर

या कॉन्क्लेवमध्ये ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेला अधिक बळ देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आधुनिक पायाभूत सुविधा उभारणी आणि सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीवर विशेष चर्चा होणार आहे. देशातील आघाडीचे तंत्रज्ञान तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि स्टार्टअप संस्थापक भारत डिजिटल युगात जागतिक नेतृत्व कसे करू शकतो, याविषयी आपले अनुभव आणि कल्पना मांडतील.

धोरणनिर्मितीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ

आयोजकांच्या मते, हा कॉन्क्लेव केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून, येथून समोर येणारे निष्कर्ष आणि शिफारसी भविष्यातील धोरणनिर्मितीसाठी सरकार, उद्योग क्षेत्र आणि विविध संस्थांना मार्गदर्शक ठरणार आहेत. विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांतील समन्वय साधण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला जाणार आहे.

नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026 – Navarashtra

Web Title: Navbharat viksit bharat leadership conclave 2026 sudhanshu trivedi prataprao jadhav digital roadmap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • delhi
  • digital
  • Navbharat Conclave
  • Navbharat Viksit Bharat Leadership Conclave 2026

संबंधित बातम्या

Dawood Ibrahim च्या साथीदारावर मोठी कारवाई; फरार अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक, ३ वर्षांपासून होता फरार
1

Dawood Ibrahim च्या साथीदारावर मोठी कारवाई; फरार अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक, ३ वर्षांपासून होता फरार

JP Nadda Health Update: केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा AIIMS मध्ये दाखल; कोरोनरी अँजिओग्राफीसह विविध तपासण्या
2

JP Nadda Health Update: केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा AIIMS मध्ये दाखल; कोरोनरी अँजिओग्राफीसह विविध तपासण्या

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

Parliament Monsoon Session: गृहमंत्र्यांच्या निवेदनाला विरोधकांचा नकार; थेट राजीनाम्याच्या मागणीने संसदेचा शेवटचा दिवसही वादळी
4

Parliament Monsoon Session: गृहमंत्र्यांच्या निवेदनाला विरोधकांचा नकार; थेट राजीनाम्याच्या मागणीने संसदेचा शेवटचा दिवसही वादळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.