Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रचारतोफा थंडावताच नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात जोरदार राडा; समर्थक भिडले आमनेसामने

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेने (उबाठा) च्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मविआचे उमेदवार गणेश गिते यांच्याकडून पैसे वाटप सुरू असल्याचा भाजपाचा आरोप आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 19, 2024 | 09:50 AM
भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर...

भाजप-शिवसेना समर्थकांमध्ये राडा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढले बाहेर अन् नंतर...

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : प्रचारतोफा थंडावताच राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आले आहे. नाशिकमध्ये भाजप-ठाकरे व पवार गटात राडा झाला तर पालघरमध्ये शिंदे व ठाकरे गटाचे समर्थक भीडले. तसेच गंगापुरात अपक्ष उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. या घटनांमुळे त्या-त्या मतदारसंघात तणावाचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या : मनसेच्या सभेत महायुतीचे झेंडे; विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेच्या अखेरच्या दिवशी पोलखोल

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेने (उबाठा) च्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मविआचे उमेदवार गणेश गिते यांच्याकडून पैसे वाटप सुरू असल्याचा भाजपाचा आरोप आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांच्या कार्यकर्त्याची गाडीही फोडली. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीही नाशिकमध्ये अशीच घटना घडली होती.

दरम्यान, आजच्या घटनेवेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. नाशिकच्या पंचवटी परिसरात भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. या घटनेनंतर पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे.

पालघरमध्ये शिंदे-ठाकरे गट भिडले

पालघर शहरातील विष्णूनगर परिसरातील वर्धमान गृहनिवासी संकुलामध्ये पैसे वाटपावरून शिंदे व ठाकरे गटात राडा झाला. शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील यांनी पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाने केला आहे. माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रवींद्र म्हात्रे यांची कार ताब्यात घेतली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी म्हात्रे यांची कार तक्रारदार यांच्यासमोर तपासली असून गाडीत पोलिसांना काहीही आढळले नाही.

अपक्ष उमेदवाराच्या कारवर दगडफेक

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झाला. अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. गळणीम रोडवर सोनवणे यांची गाडी अडवत 10 ते 15 लोकांच्या जमावाने दगडफेक केली. यात सोनवणे यांच्यासह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाळूज टोल नाक्याजवळील जवळील सीएसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : शिमल्याच्या मंदिरातील एक अनोखा कलश, साखळदंडाने न बांधल्यास पळू लागते, प्रीती झिंटाही येऊन गेलीये

Web Title: Bjp and thackeray group clashes in nashik nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 09:50 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Navnirman Sena
  • political news

संबंधित बातम्या

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
1

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त
2

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा
3

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’
4

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.