Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी जीवाला जीव देणारा माणूस, लोकसभेत सुनेत्रा पवार यांना…’; अजित पवार यांचं मोठं विधान

तसेच घरातलं भांडण चव्हाट्यावर यायला नको होतं, असे सांगत असताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. पहिला फॉर्म मी भरला, ती चूक तुम्ही करायला नको होती. फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी सांगितला, असे सांगतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2024 | 08:37 AM
...मग साहेबांनी आमचं घर फोडलं का?; अजित पवार यांना अश्रू अनावर

...मग साहेबांनी आमचं घर फोडलं का?; अजित पवार यांना अश्रू अनावर

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : लोकसभा निवडणुकीमध्ये जी चूक मी केली, ती चूक तुम्ही करायची नव्हती, असे सांगत माझ्या विरोधात साहेबांनी उमेदवार दिल्याचे म्हणतात. मग पवार साहेबांनी तात्यासाहेबांचे (अनंत पवारांचे) घर फोडले का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.

हेदेखील वाचा : Yugendra Pawar Baramati Politics: युगेंद्र पवारांना कोणता कानमंत्र द्याल? शरद पवार म्हणाले, गेली 57 वर्षे….

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कण्हेरी या ठिकाणी झालेल्या जाहीरसभेत बोलताना अजित पवार भावनाविवश झाले. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘माझी आई सांगत होती की, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. तरीदेखील ऐकलं नाही. या पद्धतीने जे काय चाललंय ते बरोबर नाही. मोठ्या व्यक्तींनी पण त्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. मी जीवाला जीव देणारा माणूस आहे. मी लोकसभेत सुनेत्रा पवार यांना उभे करून मी चुकलो; आता कोण चुकले ते सांगा’.

तसेच घरातलं भांडण चव्हाट्यावर यायला नको होतं, असे सांगत असताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. पहिला फॉर्म मी भरला, ती चूक तुम्ही करायला नको होती. फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी सांगितला, असे सांगतात. मग साहेबांनी तात्यासाहेबांचं (अनंत पवार यांचे) घर फोडलं का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. आम्ही बिकट परिस्थितीतून चांगली परिस्थिती निर्माण केली. यामध्ये माझ्या आईने आम्हाला आधार दिला, असे सांगत अजित पवार भावनाविवश झाले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. काही महिला कार्यकर्त्यांनी अजित दादा तुम्ही रडायचं नाही, तर लढायचं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा घोषणा यावेळी दिल्या. या निवडणुकीमध्ये आपण कोणावरही टीका करणार नसल्याचे अजित पवार यांनी पुन्हा सांगितले. कार्यकर्त्यांनी देखील लोकसभेवेळी आपले काम न केलेल्यांना नाराज करू नये, असे आवाहन केले.

हेदेखील वाचा : गुहागरमधून मनसेचे प्रमोद गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल! भास्कर जाधव, राजेश बेंडल यांच्याशी होणार लढत

Web Title: I made a mistake by fielding sunetra pawar in the lok sabha says ajit pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

Jagdeep Dhankhar resigned : मी आजारी नव्हतो तर…! राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य
1

Jagdeep Dhankhar resigned : मी आजारी नव्हतो तर…! राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य

AI युगात भाषेला सक्षम अन् शक्तिशाली करण्यासाठी..! मराठी भाषा गौरव दिनी राज ठाकरेंचे मराठीजनांना खास आवाहन
2

AI युगात भाषेला सक्षम अन् शक्तिशाली करण्यासाठी..! मराठी भाषा गौरव दिनी राज ठाकरेंचे मराठीजनांना खास आवाहन

काँग्रेस राज्यसभेसाठी शरद पवारांना धक्का देणार? काँग्रेसकडून ‘या’ नावाची चर्चा सुरु
3

काँग्रेस राज्यसभेसाठी शरद पवारांना धक्का देणार? काँग्रेसकडून ‘या’ नावाची चर्चा सुरु

मोठी बातमी ! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
4

मोठी बातमी ! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.