Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेच्या सभेत महायुतीचे झेंडे; विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेच्या अखेरच्या दिवशी पोलखोल

बाळा नांदगावकर यांच्या लालबाग येथील सभेला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या सभेत मनसेसह महायुतीतील घटक पक्षांचे झेंडेही फडकताना दिसल्याने पोलखोल झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 19, 2024 | 07:42 AM
मनसेच्या सभेत महायुतीचे झेंडे; प्रचारसभेच्या अखेरच्या दिवशी पोलखोल

मनसेच्या सभेत महायुतीचे झेंडे; प्रचारसभेच्या अखेरच्या दिवशी पोलखोल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून प्रचारसभा, बाईक रॅली, घरोघरी भेटीगाठी घेण्यात आल्या होत्या. त्यात सोमवारी (दि.18) सायंकाळी निवडणुकीचा प्रचार थांबला. मात्र, सध्या चर्चा आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुतीला असलेल्या छुप्या पाठिंब्याची. कारण, शिवडी मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या लालबाग येथे झालेल्या सभेतच महायुतीचे झेंडे दिसून आले होते. त्यामुळे आता एकच चर्चा सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; उद्या मतदान, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

बाळा नांदगावकर यांच्या लालबाग येथील सभेला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या सभेत मनसेसह महायुतीतील घटक पक्षांचे झेंडेही फडकताना दिसल्याने पोलखोल झाली आहे. हा सगळा प्रकार ‘फिक्सिंग’चा खेळ असल्याचे सांगत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. महायुतीत अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना पाठिंबा देण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र, शिवसेने (शिंदे गट) चे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेणार नाही, असे ठणकावून सांगितले होते.

दरम्यान, नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सरवणकरांच्या बाजूने उभे राहिले. अखेर भाजपा नेत्यांनीही अमितला पाठिंबा देण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. परंतु, नांदगावकरांबाबतचे गूढ अजूनही कायम होते. नांदगावकर यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिलेला नाही. मात्र, त्यांना पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली नाही. तसेच त्यांच्या प्रचारसभांमध्ये महायुतीचा एकही नेता दिसला नाही. मात्र, नांदगावकर यांच्या प्रचार दौऱ्यांत ते महायुतीचे उमेदवार असल्याचेही दावे करण्यात आले.

महायुतीच्या झेंड्यांनी केलं सर्वकाही उघड

सोमवारी राज ठाकरे यांच्या सभेत फडकणाऱ्या महायुतीच्या झेंड्यांनी सर्व काही उघड केले. या सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला होता.

हेही वाचा: Rahul Gandhi PC: मोदींच्या सपोर्टशिवाय अदानी हे करूच शकत नाहीत..; राहुल गांधींनी थेट मुद्द्यालाच हात घातला

Web Title: Mahayuti flags at mns election rally nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 07:42 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: शरद पवार गेम फिरवणार! राज ठाकरेंची मनसे MVA मध्ये करणार प्रवेश? भाजपसाठी हा मोठा धक्का
1

Maharashtra Politics: शरद पवार गेम फिरवणार! राज ठाकरेंची मनसे MVA मध्ये करणार प्रवेश? भाजपसाठी हा मोठा धक्का

Maharashtra Politics : पंढरपूर नगरपरिषदेसाठी दुसऱ्या दिवशी ‘इतक्या’ उमेदवारांनी घेतला अर्ज माघारी
2

Maharashtra Politics : पंढरपूर नगरपरिषदेसाठी दुसऱ्या दिवशी ‘इतक्या’ उमेदवारांनी घेतला अर्ज माघारी

Dhule : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सुरेश मालुसरे या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
3

Dhule : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सुरेश मालुसरे या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

विधानसभा निवडणुकीने उडवला धुव्वा; लालू प्रसाद यांच्याच घरात पेटला वणवा
4

विधानसभा निवडणुकीने उडवला धुव्वा; लालू प्रसाद यांच्याच घरात पेटला वणवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.