Photo Credit- Social Media संभलमधील हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश प्रशासनाने राहुल गांधींना प्रवेश नाकारला
मुंबई: महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निमित्ताने अदानींजीची नजर महाराष्ट्राच्या संपत्तीवर आहे. मुंबईच्या नैसर्गिक साधनसंपत्ती बदलण्याकडे अदानीचें लक्ष्य आहे. दुसरीकडे आमचे शेतकरी, मजूर, युवा पिढीचे स्वप्न आहे. पण महाराष्ट्र सरकार रोज त्यांची ही स्वप्ने धुळीस मिळवत आहेत.अशी सणसणीत टीका लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते
याचवेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक है तो सेफ है, हा नारा असलेली एक तिजोरी दाखवली, ही तिजोरीतून एक फोटो काढला, त्यावर उद्योगपती गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींची छायाचित्रे होती. त्यावरही एक है तो सेफ है असा नारा लिहीला होती. दुसऱ्या पोस्टरवर मुंबईतील धारावीचा नकाशा होता. धारावी हा एक लाख कोटींचा धंदा सुरू आहे, असा आरोप केला. गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी एकत्र आहेत तरच सुरक्षित आहेत असं म्हणत त्यांनी मोदींच्या एक है तो सेफ हैचा अर्थ सांगितला. मोदी आणि गौतम अदानींचा नारा आहे.
शरद पवार यांचा मोठ्या नेत्याला इशारा; म्हणाले, माझ्यासोबत या, नाहीतर…
महाराष्ट्राची निवडणूक बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाऱ्यांभोवती फिरत आहे. याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का, असा सवाल विचारला असता राहुल गांधी म्हणाले, भाजपच्य एक है तो सेफ है या नाऱ्याचा सर्वात योग्य अर्थ मी तुम्हाला आताच समजावून सांगितला. एक कोण आहेत तर अदानीजी आणि मोदीजी आहेत. अमित शाहाजी आहेत. सेफ आहेत तर कोण सेफ आहेत. अदानीजी आहेत, कष्ट कोणाला होणार, नुकसान कुणाचे होणार तर धारावीच्या जनतेचे होणार, हिंदुस्तानातील लघु आणि सुक्ष्म उद्योगांचं एक महत्त्वाचं ठिकाण हे धारावी आहे. एकाच व्यक्तीसाठी हे मुळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नारा त्यांनी दिला आम्ही समजावून सांगितला.
2005 पासून धारावीत कोणताही विकास झालेला नाही. मग आता धारावी पुनर्वसनाचा प्रकल्पाला विरोध का करत आहात. आमचा विचार अगदी स्पष्ट आहे. जे लोक धारावीत राहतात त्यांच्या जमिनी आहेत. ते लोक गेल्या अनेक वर्षांपासून तिथे राहतात, धारावी हा सुक्ष्म उद्योगांचे हब आहे. धारावीत बदल करण्यासाठी इतर अनेक मुद्दे आहेत. त्यांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत.धारावीत पुराचाही प्रश्न आहे. पण हा धारावी पुनर्वसनाचा प्रकल्प हा एका व्यक्तीची मदत करण्यासाठी केला जात आहे. याला आमचा विरोध आहे. पण तरीही संपूर्ण राजकीय यंत्रणा त्या एका व्यक्तीच्या मदतीसाठी काम करत आहेत.
पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल; पीएम मोदींनी मानले आभार म्हणाले
याच एका व्यक्तीला देशातील विमानतळे दिली जात आहेत. याच व्यक्तीला संरक्षण खात्याची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज दिल्या जात आहेत. याच व्यक्तीला पोर्ट दिले जात आहेत. याच व्यक्तीला धारावी दिली जात आहे. हे सर्व अदानी उघडपणे करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व होऊ शकत नाही. हा निवडणुकीचा मुद्दा आहे.