Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

maharashtra election result 2024 : देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये आघाडी कायम; घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. नागपूरमध्ये राजकारण रंगले आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 23, 2024 | 10:39 AM
Nagpur South West devendra fadnavis election result 2024

Nagpur South West devendra fadnavis election result 2024

Follow Us
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून राज्यभरातील मतमोडणीला सुरुवात झाली आहे. आता राज्यामध्ये सध्या तरी पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महायुतीकडे सध्या 207 जागांचे लीड आहे. तर महाविकास आघाडीकडे फक्त 70 हून अधिक जागांचे आघाडी दाखवण्यात येत आहे. मात्र हे चित्र कधीही बदलू शकते. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.

नागपूरमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र भाजप आणि काँग्रेसशिवाय बहुजन समाज पक्षाचे सुरेंद्र श्रावण डोंगरे यांचाही मोठ्या नावांमध्ये समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे डॉ आशिष देशमुख यांचा 49 हजार 344 मतांनी पराभव केला होता. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर आहेत.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे. फडणवीस यांना 13 हजारांहून अधिक मते सध्याच्या मतमोजणीनंतर पडली आहे. फडणवीस हे 6 हजार हून अधिक मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या विरोधात असलेले कॉंग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना केवळ 6 हजार मते पडली असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे. मतमोजणीच्या पूर्ण फेऱ्या होण्याचे अद्याप बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये भाजप नेत्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जोरदार प्रचार

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. मागील दीड महिन्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने प्रचाराचा धुराळा उडवला होता. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या प्रचारासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. देवेंद्र फडणीवस यांनी मागील महिन्याभरामध्ये 25 जिल्ह्यांमध्ये प्रचार केला असून 64 हून अधिक जाहीर सभा आणि रॅली घेतल्या आहेत. त्यामुळे आता निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षश्रेष्ठी कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Nagpur south west election result devendra fadnavis election maharashtra assembly live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 10:39 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Election Result 2024
  • maharashtra election 2024
  • Nagpur

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग
2

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral
3

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
4

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.