पुण्याचं पालकमंत्रिपद स्वीकारणार का?; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पार पडली असून पोस्टल मतपत्रिका मोजणी पार पडली आहे. यामध्ये पुण्यातील निकाल समोर येत असून पुण्यातील कोथरुडमध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी आता माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील 288 जागांवर मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडले. आता आज(दि.23) मतमोजणी होत असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी पार पडत आहे. दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी 160 जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “कोथरूडमध्ये फक्त लीड मोजायचा आहे. या ठिकाणच्या जनतेशी माझी नाळ इतकी जोडली गेलीये की, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने माझा विजय होईल, हे निश्चित आहे,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात 160 पेक्षा जास्त महायुतीला मिळणार आहे. या निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. राज्यात लोकसभेनंतर केलेली काम दिलेले योजनांचा आलेले निकालात फायदा दिसून येतोय. विरोधकांनी चुरस निर्माण केल्याचा प्रयत्न केला पण तसं झालं नाही” असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये चुरशीची लढत झाली होती. आता मतमोजणी होत असून निकालांचा कल हाती येत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला कॉंग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर हेमंत रासने यांनी आघाडी घेतली आहे. तर कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांची सुरुवातीपासून आघाडी आहे. हडपसरमध्ये चेतन तुपे हे तब्बल 10,520 मतांनी आघाडीवर आहेत. तर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघामध्ये चौथ्या फेरी अखेर अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे 8,391 मतांनी आघाडीवर आहेत. शिवाजीनगरमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे 8,298 मतांनी आघाडीवर आहेत.