Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीच्या प्रचाराचा मास्टरप्लॅन! पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ दिवस असणार महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी राज्यामध्ये येणार आहेत. मोदी हा महाराष्ट्र दौरा चर्चेचा विषय ठरला असून ते आठ दिवस महाराष्ट्रामध्ये असणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 24, 2024 | 05:32 PM
PM Narendra modi in maharashtra for election campaigning

PM Narendra modi in maharashtra for election campaigning

Follow Us
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अवघ्या एका महिन्यावर निवडणूक आली असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिली यादी जाहीर करत बाजी मारली. त्याचबरोबर शिंदे गट व अजित पवार गटाने सुद्धा उमेदवार जाहीर केले आहेत. आता प्रचारासाठी महायुतीने मोठा प्लॅन तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. तब्बल आठ दिवस ते महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून बसणार आहेत.

महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी आज दिल्लीवारी केली आहे. काही जागांवर महायुतीमध्ये कलह निर्माण झाला होता. या संदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीमध्ये गेले होते. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी तिन्ही नेत्यांची ही बैठक झाली असून यामध्ये जागावाटपाची शेवटची चर्चा होऊन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा महाराष्ट्र दौरा ठरला आहे. प्रचारासाठी पंतप्रधान मोदी हे आठ दिवस राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

हे देखील वाचा : नवीन युगाचा नवा प्रचार! निवडणुकीच्या प्रचारामध्ये आलं AI, अजित पवारांच्या पक्षाचा Video समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे महायुतीचा प्रचार कशा पद्धतीने करायचा आणि कोणकोणते राष्ट्रीय नेते राज्याच्या दौऱ्यावर येणार याची बांधणी सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आठ दिवस नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत. फक्त भाजपच्या उमेदवारांसाठी नाही तर महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत. विभाग निहाय या सभा पार पडणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्र दौरा असणार आहे. 14 नोव्हेंबर नंतर पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असल्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त सभा घेण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या प्रचारामध्ये मोठा प्रभाव आणणार आहेत.

लोकसभेवेळी महाराष्ट्रात पंतप्रधानांचा दौरा

काही महिन्यांपूर्वी देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. यावेळी सुद्धा प्रचारामध्ये महायुतीने जोरदार प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रावर लक्ष देत अनेक प्रचार सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेवेळी महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून होते. त्याचबरोबर भाजपचे इतर केंद्रीय नेते देखील प्रचारासाठी येत होते. आता विधानसभा निवडणुकीवेळी देखील पंतप्रधान मोदी हे आठ दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह यांनी देखील महायुतीचे जागावाटप व फॉम्युला ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Web Title: Pm narendra modi in maharashtra for election campaigning of bjp and mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • narendra modi
  • Vidhansabha Election 2024

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील
2

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’
4

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.