अजित पवार यांचा विधानसभेच्या प्रचारासाठी AI चा वापर (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. निवडणुकीला अवघा एक महिना राहिला असून येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 तारखेनंतर राज्यामध्ये सरकार स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरु केली असून नेत्यांचे दौरे, बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. प्रचारासाठी अनेक केंद्रीय नेते महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्याचबरोबर लोकप्रिय व्यक्तींना देखील प्रचाराला आणले जात आहे. अजित पवारांनी प्रचारासाठी थेट एआयचा वापर केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हटका प्रचार केला आहे.
सध्याचे युग हे डीजिटल आणि टेक्नोलॉजीचे आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाचे देखील आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा वापर करत असल्यामुळे यामुळे नेत्यांनी देखील अपडेट देण्यास सुरुवात केली होती. आपल्या सर्व अपडेट नेते सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मचा वापर करुन देत होते. यामधून नवीन मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता अजित पवार यांनी प्रचारासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे. सोशल मीडियावर AI ने तयार केलेली व्हिडिओ शेअर केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना हा नवा प्रचार नक्कीच भुरळ घालत आहे.
तुमच्या दादाचा पक्का वादा..! pic.twitter.com/aPVBxXoANw
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 24, 2024
काय आहे AI जाहिरातीमध्ये?
अजित पवार यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन ही जाहिरात शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला आहे. 53 सेकंदाचा हा प्रचार व्हिडिओ आहे. यामध्ये एक दाम्पत्य दिसून येत आहे. रात्रीच्या अंधारामध्ये बसमध्ये माणूस अडकला आहे. त्याची बायको घरी मुलांच्या वाढदिवसासाठी त्याची वाट पाहत आहे. फोनवरुन संवाद साधत असून ते केकसाठी आणि खरेदीबाबत बोलत आहे. यावर घरातील महिला माझ्याकडे पैसे आहेत, मी वाढदिवसाचे सामान आणते, असे म्हणते. अजित दादांनी वादा केल्याप्रमाणे पैसे दिले असल्याचे ती महिला म्हणत आहे. अशा स्वरुपाची ही अजित पवार यांची लाडकी बहीण योजनेचा प्रचार करणारी AI चा वापर करुन केलेली जाहिरात आहे. सोशल मीडियावर ती तुफान व्हायरल होत आहे.