मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय
अमरावती : राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार कधी स्थापन होणार आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे. तर मुंबईमध्ये खातेवाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये महायुती सरकार स्थापनेचा दावा करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सर्व चित्र स्पष्ट होईल. मात्र एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये कोणतं पद मिळणार यावरुन राजकारण रंगले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच मोठं झालं असा टोला महायुतीच्या पूर्वीच्या मित्रपक्षाने लगावला आहे.
राज्यामध्ये महायुतीच्या सरकार स्थापनेवरुन आणि खातेवाटपावरुन राजकारण रंगले आहे. मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे यांनी दावा सोडला आहे. तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी गृहविभाग व नगर विकास खात्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावरुन आता महायुतीमध्ये काय होणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे. दरम्यान, महायुतीवर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी जहरी टीका केली आहे. तसेच भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा. त्यांनी चांगला कारभार करावा. शेतकर्यांची कर्ज माफीची घोषणा करावी. दिव्यांगांचे मानधनांमध्ये वाढ करावी. मला असे वाटते का एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे त्याचे लाडके शेतकरी करता येईल का? लाडका मजूर करता येईल का? लाडका दिव्यांग करता येईल का? हा विचार करावा,” असे मत बच्चू कडू म्हणाले आहेत.
पुढे बच्चू कडू यांनी भाजपच्या बहुमतावर आणि पूर्ण सत्तेमध्ये आल्यानंतर भाजपच्या वागणुकीवर भाष्य केले. कडू म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले. एकनाथ शिंदे हे राज्यातच असतील ते केंद्रात जाणार नाहीत. भाजपा त्यांना गृहमंत्री पद देणार नाही. भाजपाने त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं झाले. भाजपाने तेवढी तरी जाणीव ठेवली आहे,” असा टोला बच्चू कडू यांनी भाजपला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे केंद्रातील राजकारणावर भविष्यवाणी करत बच्चू कडू म्हणाले की, “चांगली गोष्ट आहे मला वाटतं आता या सगळ्या समीकरणात श्रीकांत शिंदे असेल किंवा प्रफुल पटेल असेल केंद्रामध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण होऊ नये कदाचित केंद्रात जर गरज राहिली नसती तर आज राज्याचे चित्र वेगळं राहिलं असतं भाजपला केंद्रात पण गरज आहे ना मित्र पक्षाची मित्रपक्ष नाहीतर केंद्रात मग सत्ता ते पण अडचण येऊ शकतात,” असे स्पष्ट मत प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.