राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कॉँग्रेसची टीका
भाजपने दिले जोरदार प्रत्युत्तर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण झाली 100 वर्षे
काल जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली. देशभरात संघाचा विजयादशमीचा उत्सव पार पडला. देशभरात पथसंचलन करण्यात आले. दरम्यान कॉँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. कॉँग्रेस नेत्याने संघाला दहशतवादी संघटना असे संबोधले. त्यामुळे या टीकेला भाजपने देकगीळ जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कॉँग्रेस नेते उदित राज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना असे संबोधले. त्यावर भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ यांनी उदित राज यांचे विधान मूर्खपणाचे, अज्ञानपणाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी हे विधान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वंचित, मागासलेल्या वंचित आणि अनुसूचित जमातींसाठी काम केले आहे. मानवजातीची, देवाची सेवा आणि राष्ट्र प्रथम या विचारांमुळे देशवासियांमध्ये संघाबद्दल आदर निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताला देवता मानणारे आणि देशासाठी तपस्या करणारे लोकांचे संघटन आहे. गेल्या 100 वर्षांपासून ही संस्था व्यक्ती निर्माणाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य करत आहे. देशाला एकजूट करण्यासाठी संघ काम करत आहे.
काय म्हणाले होते उदित राज?
कॉँग्रेस नेते उदित राज यांनी संघाचा उल्लेख दहशतवादी संघटन म्हणून केला. याच विचारसरणीमुळे महात्मा गांधी यांची हत्या झाली असे उदित राज म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लेखामध्ये लिहिले आहे की, १०० वर्षांपूर्वी विजयादशमीच्या भव्य उत्सवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या परंपरेची ही पुनर्स्थापना होती, ज्यामध्ये राष्ट्रीय चेतना वेळोवेळी युगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन अवतारांमध्ये प्रकट झाली आहे.
या युगात, संघ हा त्या शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या अशा महान प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत हे आपल्या स्वयंसेवकांच्या पिढीचे सौभाग्य आहे. या प्रसंगी, राष्ट्रसेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांना मी शुभेच्छा देतो. संघाचे संस्थापक, आमचे आदर्श… परमपूज्य डॉ. हेडगेवार जी यांना मी आदरांजली वाहतो. संघाच्या १०० वर्षांच्या या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करण्यासाठी, भारत सरकारने विशेष टपाल तिकिटे आणि स्मारक नाणी देखील जारी केली आहेत, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत.