कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न केले आहेत (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. त्यानंतर जोरदार राजकारण सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय झाला असून महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे मविआच्या घटक पक्षांना मोठा धक्का बसला आहे. पराभवानंतर मविआने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आता कॉंग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करुन निवडणूक आयोगाला 10 गंभीर प्रश्न विचारले आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अफाट मताधिक्य मिळाले. अगदी राज्यामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून देखील कोणत्याही पक्षाला दावा करता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाकडून 65.11 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर निकालामध्ये भाजपला 132, अजित पवार गटाला 41 आणि शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. यामुळे सर्वांत जास्त जागा मिळवून भाजप राज्यामध्ये मोठा पक्ष असल्याचे एकप्रकारे सिद्ध झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निवडणूक आयोगाला गंभीर प्रश्न केले आहेत. तसेच या सर्व प्रश्नांची पुराव्यासहित उत्तर द्यावीत, अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. झालेले मतदान, जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत असून पारदर्शक निवडणुकीचा घोषा लावणा-या निवडणूक आयोगाकडूनच नियमांना हरताळ फासण्यात आल्याच्या शंका प्रसारमाध्यमे, विविध सामाजिक संस्था आणि संशोधन करणा-या व्यक्तींकडून उपस्थित केल्या जात आहेत.”
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
निवडणूक आयोगाच्या संशयास्पद प्रक्रियेबद्दल आमचे काही प्रश्न आहेत;
वरील सर्व प्रश्न आणि मतदारसंघनिहाय अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. मतदानाची टक्केवारी, मतदान वाढ, मतांची गणना यामध्ये ताळमेळ बसत नसल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण का देण्यात आलेले नाही? लोकशाहीमध्ये लोकांची मते चोरण्याचे काम निवडणूक आयोगाने करता कामा नये आणि लोकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी पुराव्यासह सर्वांसमोर मांडावीत अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.