Priyanka Gandhi accepted Narendra Modi's challenge in maharashtra elections 2024
शिर्डी : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यामुळे नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. भाजपकडून कटेंगे तो बटेंगे अशा स्वरुपाच्या घोषणा देऊन महाविकास आघाडीला आव्हान दिले जात आहे. आता महायुतीचे आव्हान कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी स्वीकारले आहे. प्रियांका गांधी या महाराष्ट्राच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये उचरल्या आहेत. शिर्डीमध्ये सभा घेऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. आता नरेंद्र मोदींचे आव्हान प्रियांका गांधींनी स्वीकारले असून महायुतीला देखील आव्हान दिले आहे.
शिर्डीमधील सभेमध्ये कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने माझ्या भावाच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेते आहे. मी राहुल गांधी यांची बहीण आहे. मी बोलतीये नरेंद्र मोदी ऐकून घ्या..नीट ऐका…बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ऐकून घ्या. हे खरं आहे की आमची विचारधारा वेगळी होती. आमचा रस्ता आणि आमचे राजकीय विचार वेगळे होते. पण आमचा नेता काय किंवा बाळासाहेब ठाकरे काय, कोणीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करु शकत नाही. करणार देखील नाही, असे प्रत्युत्तर प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला दिले.
प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला सडेतोड उत्तर दिल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना देखील एक आव्हान दिले. प्रियांका गांधी म्हणाल्या की, “माझं पण आव्हान लक्षात ठेवा…ज्या प्रकारे तुम्ही आव्हान देता त्याप्रमाणे आता मी नरेंद्र मोदी व अमित शाह यांना आव्हान देते. मंचावर उभे राहून त्यांनी हे सांगावं की ते जातीय जनगणना करणार आहेत. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकेन, असे त्यांनी भर सभेमध्ये सांगावे,” असे थेट आव्हान कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी दिले आहे.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, “राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याची टीका महायुतीकडून केली जाते. यावर बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, ह्यांचा पक्ष माझा भाऊ आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे असे सांगतात. जो व्यक्ती मणिपूर ते मुंबई आणि कन्याकुमारी ते काश्मीर अशी न्याय यात्रा केली, त्या व्यक्तीबद्दल बोलतात की आरक्षणविरोधी आहे. खोटं बोलतात हे. मंचावर भाषण देताना मतदारांसमोर सत्य माहित असून देखील ते सर्रास खोटं बोलतात. हे आता राहुल गांधी व त्यांचा पदयात्रेला घाबरले आहेत.”
नवाब मलिकांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा? माझ्या नादी लागू नका…मलिकांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पाठवून यांनी भेदभाव केल्याचा आरोप देखील केला आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, “एका आईला दोन किंवा तीन मुलं असतात. पण प्रत्येक आईसाठी आपली सगळी मुलं सारखीच असतात. आई ही मुलांवर एक समान प्रेम करते व माया लावते भेदभाव करत नाही. सरकार हे सुद्धा देशाला आई वडिलांप्रमाणे असते. पण पंतप्रधान मोदींसाठी सर्व राज्य एकसमान नाहीत. महाराष्ट्राचे अनेक उद्योग धंदे गुजरातकडे वळवण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरु असो किंवा इंदिरा गांधी यांनी देशनिर्माणमध्ये कधीच कोणत्या राज्यामध्ये भेदभाव केला नाही. महाराष्ट्रातून जवळपास 10 लाख करोड गुंतवणूक महाराष्ट्रातून हटवण्यात आली,” असा गंभीर आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.
काय होते पंतप्रधान मोदींचे आव्हान?
महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा पार पडल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस व ठाकरे गट यांच्या अनैसर्गिक युतीवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याकडून स्वर्गीय नेते बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पंधरा मिनिटे बोलून दाखवावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.