नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोर्टात केस करण्याचा इशारा (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : पहिल्यांदाच तीन पक्ष मिळून महायुती व महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. बंडखोरीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे चुरशीची लढत होत आहे. महायुतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ असल्याचे जागावाटप व उमेदवारी देण्यावरुन लक्षात आले आहे. अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदावारीला भाजपकडून सातत्याने विरोध केला गेला. तरी देखील अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिलीच. यामुळे नवाब मलिक यांच्यावरुन महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजप व नवाब मलिक यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. नवाब मलिक यांचे दाऊतशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून सातत्याने त्यांच्या उमेदवारीला नाकारण्यात येत होते. याबाबत प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, कुणी कितीही मोठं असू द्या किंवा छोटी असू द्या. देवेंद्रजी पण असू द्या मी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. जर या लोकांनी माफी मागितले नाही. तर मी यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. सिव्हिल आणि डिफेन्सेस केस टाकणार आहे, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नवाब मलिक यांच्या उमेदवारीला आणि प्रचाराला भाजपकडून नकार आहे. त्याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा नबाब मलिक मागतोय का? आम्ही मागत नाही, आम्ही मागणारही नाही. मागणारा नवाब नाही, आम्ही देणारे आहोत. नबाब मलिक कोणाला घाबरत नाही. आता आम्ही बोलायला सुरुवात केली तर कोर्टात जाताय की यांची जामीन रद्द करा. मला तुरुंगात टाका. आणखीन मला दहा- वीस हजार मत वाढतीलय माझ्या बाबतीत जे गैरसमज निर्माण करतात. दाऊदशी माझं नाव जोडतात. काही लोक आतंकवादी बोलतोय काही लोक देशद्रोही बोलतायेत. या सगळ्यांच्या विरोधात मी तपासून नोटीस पाठवणार आहे. सगळ्यांवर क्रिमिनल केस टाकणार आहे, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अपडेट घ्या जाणून
तसेच भाजपकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये बेटेंगे तो कटेंगे असा नारा देण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी हा नारा दिला असून यांची रेघ पुढे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओढली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं या आशयाची घोषणा दिली. बेटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरुन अजित पवार यांनी सुरुवातीला विरोध केला होता. त्यावर आता मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझे विचार भाजपला जोडणार नाही. ‘बेटेंगे तो कटेंगे’ असं म्हणत आहेत. हे राजकारण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. इतके घाणेरडा राजकारण होईल. तितक्याच खोलात ते जात राहतील, असे स्पष्ट मत नवाब मलिक यांनी मांडले आहे.
नवाब मलिकांसमोर तगडे आव्हान
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मलिकांच्या विरोधात महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार शिंदे गटाने सुरेश कृष्ण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पण या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी तीन वेळा निवडून आलेले आहेत. नवाब मलिक यांच्यासमोर दोन्ही उमेदवारांचे आव्हान असणार आहे.