Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश; पराभूत उमेदवारांना…

पुण्यातील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली असून, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांच्या बैठकीत दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2024 | 12:38 PM
विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले 'हे' आदेश

विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले 'हे' आदेश

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक होऊन त्याचे निकालही समोर आले आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांच्या महायुतीला चांगले यश मिळाले आहे. महायुतीने बहुमताचा आकडाही पार केला आहे. तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. याशिवाय, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही एकही जागा मिळवता आली नाही. त्यावरच राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली.

हेदेखील वाचा : मागील सरकारमध्ये जे झालं ते नव्या सरकारमध्ये होणार नाही; भाजप ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज ठाकरे यांनी पुण्यातील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली असून, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांच्या बैठकीत दिले. विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे देखील माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले. राज्यात एकही आमदार निवडून न आलेल्या राज ठाकरे यांनी पुण्यात पराभूत उमेदवारांची बैठक घेतली.

दरम्यान, मनसेच्या या बैठकीत उमेदवारांनी आपली मते मांडताना, ईव्हीएम मशिनविषयी अधिक तक्रारी केल्या. त्यासंदर्भात बहुतेक उमेदवारांचा सूर होता. तसेच प्रतिस्पर्धी उमेवारांकडून केला गेलेल्या पैशांच्या वापरापुढे निधी कमी पडल्याचे कारणही काही उमेदवारांनी सांगितले. यावेळी पक्षाचे नेते बाबू वागसकर, राजू उंबरकर, बापू धोत्रे, बाळा शेडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अर्धा तास झाली पदाधिकाऱ्यांची बैठक

पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अर्धा तास चाललेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी उमेदवारांची बाजू समजून घेतली. त्यांनतर विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरुन आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश ठाकरे यांनी दिले.

हेदेखील वाचा : राज्याचा मुख्यमंत्री अखेर दिल्लीने ठरवला ! अमित शहांकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब, शपथविधीही ठरला?

Web Title: Raj thackeray took meeting of party workers nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • political news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.