Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 15 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून हे उमेदवार जाहीर करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 26, 2024 | 10:27 AM
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून अवघ्या एका महिन्यावर निवडणूका आल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी नवीन सरकार स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यापूर्वी उमेदवारी एक यादी जाहीर करण्यात आली होती. आता ठाकरे गटाने 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चर्चेचा जास्त वेळ लागला. त्यामुळे शरद पवार गट, ठाकरे गट व कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अगदी नंतर जाहीर होत आहेत. यापूर्वी ठाकरे गटाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यातील अनेकांनी शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटाने त्यांच्या पक्षातील दुसरी यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आणखी 15 जणांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे.

हे देखील वाचा : मविआच्या फार्म्युल्याबाबत अजूनही सस्पेन्स कायम, दिल्लीतील कॉंग्रेसच्या बैठकीत नक्की काय ठरलं? वाचा सविस्तर

कोणाला मिळाली संधी?

ठाकरे गटाने जाहीर केलेल्या या दुसऱ्या यादीमध्ये 15 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये शिवडीमधून अजय चौधरी, धुळे शहरमधून अनिल गोटे, चोपडामधून राजू तडवी, जळगाव शहरमधून जयश्री सुनील महाजन, बुलढाणामधून जयश्री शेळके, दिग्रसमधून पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोलीमधून रूपाली राजेश पाटील, परतूरमधून आसाराम बोराडे, देवळालीमधून योगेश घोलप, कल्याण पश्चिममधून सचिन बासरे, कल्याण पूर्वमधून धनंजय बोडारे, वडाळामधून श्रद्धा श्रीधर जाधव, भायखळामधून मनोज जामसुतकर, श्रीगोंदामधून अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवलीमधून संदेश भास्कर पारकर यांनी ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.

हे देखील वाचा : उमेदवार, राजकीय पक्षांच्या खर्चावर करडी नजर ठेवा ! केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांचे निर्देश

ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. अनेक मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत दिसून येणार आहे. महाविकास आघाडीमधून देखील शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट व कॉंग्रेस हे एकत्रितपणे पहिल्यांदाच विधानसभेला सामोरे जात आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये अनेकदा शीतयुद्ध होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रंगणार हे निर्विवाद आहे.

Web Title: Shiv sena uddhav thackeray group released second list of candidates in the wake of assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 10:27 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
3

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
4

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.