Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक देवाभाऊ एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्रचार सभांमधून टीका टिप्पणी केली जात आहे. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेवरुन टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 07, 2024 | 04:45 PM
uddhav Thackeray target mahayuti before elections 2024

uddhav Thackeray target mahayuti before elections 2024

Follow Us
Close
Follow Us:

दर्यापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्रचार सभांचा धुराळा उडाला आहे. प्रचारासाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दिल्लीतील नेते देखील महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. उद्धव ठाकरेंच्या या वचननाम्यामध्ये निवडणून आल्यानंतर अनेक प्रकल्पांना मंजूरी देणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांची दर्यापूरमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीमध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आला. उद्धव ठाकरे यांनी गजानन लवटे यांना उमेदवारी दिली आहे. दर्यापूर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, यंदाची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, तर महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आपण सगळेजण महाराष्ट्र प्रेमी म्हणून एकवटलो आहोत आणि पलिकडे महाराष्ट्र द्रोही आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

हे देखील वाचा : मुंडे भाऊ बहिणींवर गंभीर आरोप; जमीन लाटल्याचा सारंगी महाजनांचा दावा

पुढे ते म्हणाले की, “मी त्यांना महाराष्ट्र द्रोही यासाठी म्हणतो की, त्यांनी आपलं चांगलं चाललेल सरकार गद्दारी करुन पाडलं. गद्दारी ही महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाही पण ह्यांच्या रक्तामध्ये आहे. म्हणून ते महाराष्ट्र द्रोही आहे. महाराष्ट्रचे जे काही हक्काचं आहे ते ओरबाडून गुजरातला नेत आहेत. मग हे महाराष्ट्र प्रेमी कसे असू शकतात. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. मला अभिमान आहे या गोष्टीचा की महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही. जे आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं करतो आहे,” असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : घरात बसून कारभाराची सवय गेली नाही…; मातोश्रीवरुन जाहीर झालेल्या वचननाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

पुढे ते म्हणाले की, “आपल्या पुढचे आव्हान अजून संपलेले नाही. आपण महाराष्ट्राने लोकसभेला दाखवून दिलंच आहेच. माजलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली ठिणगी महाराष्ट्राने पेटवली. गेली 10 वर्षे आपण त्यांच्यासोबत होतो. 40 च्यावर खासदार आले, अजून काय द्यायचं बाकी होतं. खासदार दिले…आमदार दिले…वरची सत्ता दिली…खालची सत्ता दिली…तर त्यांच्या डोक्यात हवा दिली. मग हवा काढायला नको. हे जनतेच्या जीवावर गॅसचे फुगे वरवर जायला लागले. टाचणी मारली तर आला फुगा खाली. आता पुन्हा एकदा करुन दाखवायचे आहे. मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आणि इतर निर्णय घेतले ते अहंकाराने येऊन सांगितलं नाही. कारण ते माझं कर्तत्व होतं. मी कधी हे मिरवून सांगितलं नाही. आज ज्यांचं हे सुरु आहे हे सगळे भाऊ. एक देवाभाऊ..एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ…यांच्यामध्ये भाऊबंदकी एवढी झाली आहे. पण एका बाबत यांची एकी झाली आहे. आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. आता निवडणुकीमुळे यांना बहीणींवर प्रेम आलं आहे. पण महिलांच्या सुरक्षेचे काय?” असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी जोरदार दर्यापूरमध्ये प्रचारसभेमध्ये टीका केली आहे.

Web Title: Shivsena uddhav thackeray target fadnavis shinde ajit pawar before vidhnasabha elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 04:44 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Elections 2024
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय
1

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 48 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर
2

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 48 उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

‘एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान
3

‘एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा
4

Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.