Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा

देशात सध्या हिंदुत्त्वाची मोठी लाट आहे. याचाच फायदा घेत मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या काही उमेदवारांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांची मागणी होत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 27, 2025 | 01:07 PM
Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा
Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीसाठी भाजपची हिंदुत्त्वाची खेळी
  • हिंदुत्वावादी नेत्यांच्या प्रचारसभा
  • मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार; सुनील शुक्लांचा दावा
Campaign Rallies of Hindutva leaders: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाली आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवणार आहेत. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत ठाकरे ब्रँडची चर्चा सुरू आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना अजेंड्यावर ठेवत ठाकरे बंधूंकडे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. ठाकरे बंधुंच्या युतीमुळे भाजप आणि शिंदे गटाची धाकधूक वाढल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंना शह देण्यासाठी आता भाजपने नवी खेळी केली आहे. सध्या देशभरात हिंदुत्त्वाची लाट आहे. याच मुद्द्यावरून भाजपने मुंबईतही हिंदुत्त्वाची नवी रणनीती आखली आहे.

Political News : पुण्यात काका-पुतण्या एकत्र नाहीच; दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य आघाडी चर्चेनंतर फिस्कटली

हिंदुत्वावादी नेत्यांच्या प्रचारसभा

देशात सध्या हिंदुत्त्वाची मोठी लाट आहे. याचाच फायदा घेत मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या काही उमेदवारांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांची मागणी होत आहे. या उमेदवारांनी उत्तर भारतातील काही हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या सभा घेण्यासाठी पक्षनेतृत्त्वाकडे फिल्डिंगही लावल्याची माहिती आहे. ठाकरे बंधुंच्या मराठी विरूद्ध अमराठीला उत्तर देण्यासाठी ‘हिंदुत्त्वा’चा उतारा म्हणून महायुतीकडून हालाचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईतील हिंदी भाषिकांना, उत्तर भारतातील मतदारांना आकर्षित करण्यााठी हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभा होणार असल्याची चर्चा आहे.

मराठी आणि हिंदी भाषिक मतदारांसह नवमतदारांमध्ये हिंदुत्त्वाचे वातावरण आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवकल्याण आणि राज्यातले मंत्री नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांच्या सभांची जोरदार मागणी होत आहे. उत्तर भारती नेत्यांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या सभांची मागणी होत आहे. त्यामुळे मुंबईत येत्या काही दिवसात परप्रांतीय हिंदी भाषिक हिंदुत्त्ववादी नेते प्रचार करताना दिसू शकतात.

महापालिका निवडणुकीत ‘हिंदुत्व विरुद्ध ध्रुवीकरण’ रंगणार

मुंबईसह वसई-विरार, मिरा-भाईंदर–भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे–पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर आणि सोलापूर महापालिकांतील भाजप-शिवसेना (महायुती) उमेदवारांनी मंत्री नितेश राणे यांच्या प्रचारसभांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवार यासाठी आग्रही असून, लोकसभा-विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महायुतीचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हाच प्रचार पॅटर्न राहणार असल्याचे संकेत आहेत.

Sanjay Raut PC: भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने…. ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मागील काही दिवसांत आपल्या भाषणांत हिंदुत्वाबाबत कोणताही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेण्याची तयारी सुरू असून छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामू यांना सोबत घेण्यात आले आहे. मुंबईतही यापूर्वी अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता.

बॅनरमधून ठाकरे बंधुंना डिवचले

धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईत शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीय सेनेने पुन्हा एकदा वादग्रस्त बॅनर लावला आहे. “उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे” असा मजकूर या बॅनर्सवर लिहीण्यात आला आहे. मनसे आणि हिंदी भाषिकांमधील वाद हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे या बॅनर्सच्या माध्यमातून मनसे नेते संदिप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे. संदीप देशपांडे यांनी, “मराठीचा अपमान कराल तो नहीं बटोगे तो भी पिटोगे.” असा खुला इशारा दिला होता. या प्रत्युत्तर म्हणून हा बॅनर लावल्याची चर्चा आहे. पण या बॅनर्समुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वाद उफाळण्याची शक्यता आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार; सुनील शुक्लांचा दावा

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, असा दावा उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत हे मराठी असू शकतात, तर मुंबईचा महापौर उत्तर भारतीय का असू शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुनील शुक्ला यांनी मनसेवर टीका करत सध्या उत्तर भारतीयांविरोधात ‘नेट प्रॅक्टिस’ सुरू असून, मनसे सत्तेत आल्यास ‘सीझन क्रिकेट’ सुरू होईल, असा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उत्तर भारतीयांवर मारहाणीच्या घटना घडत असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी “नहीं बटोगे तो भी पीटोगे” असे वक्तव्य करत आम्ही सत्तेत येत आहोत, कोणाची भीती नाही, असे म्हटले आहे. उत्तर भारतीय विकास सेना महानगरपालिका निवडणुकीत १०० मराठ्यांना तिकिटे देणार असल्याची घोषणाही सुनील शुक्ला यांनी केली आहे.

 

Web Title: Hindutva vs thackeray brand mumbai civic polls bjp eyes hindi speaking voters with hindutva strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • BJP Politics
  • BMC Election 2025
  • Hindu
  • MNS Raj Thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब
1

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब

Sangali News: प्रदेशाध्यक्षांसमोरच सांगली भाजप नेत्यांचा राडा; आयात उमेदवारांवरुन जोरदार संघर्ष
2

Sangali News: प्रदेशाध्यक्षांसमोरच सांगली भाजप नेत्यांचा राडा; आयात उमेदवारांवरुन जोरदार संघर्ष

Bangladesh Violence: बांगलादेशातील हिंदूंची हत्या आणि हिंसाचारावर भारताचा तीव्र संताप; परराष्ट्र मंत्रालयाने सुनावले खडेबोल
3

Bangladesh Violence: बांगलादेशातील हिंदूंची हत्या आणि हिंसाचारावर भारताचा तीव्र संताप; परराष्ट्र मंत्रालयाने सुनावले खडेबोल

Maharashtra Politics: सगळे सोडून चालले! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
4

Maharashtra Politics: सगळे सोडून चालले! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.