Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे दिलीप मानेंची सिंहगर्जना; महाविकास आघाडीत पेच निर्माण

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपामुळे सोलापूरमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेस नेते नाराज झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 26, 2024 | 02:10 PM
Dilip Mane of Congress upset in Solapur South

Dilip Mane of Congress upset in Solapur South

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरमध्ये राजकारण रंगले आहे. दक्षिण सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला आहे. अस्वस्थ असलेल्या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी सिंहगर्जना केली आहे . गेल्या अनेक दिवसांपासून दिवसरात्र कार्यकर्ते मतदारांमध्ये जाऊन काम करत आहेत. दक्षिण मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बाल्लेकिल्यात काँग्रेसला विश्वासात न घेता शिवसेना उबाठा गटांने परस्पर उमेदवारी देऊन एबी फॉर्म दिले असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. दिलीप माने यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

माझ्या वडीलांवर बंडखोरीची वेळ आली होती तशीचं वेळ माझ्यावर आली आहे. माझा अंत पाहू नका नाही तर जिल्ह्यातील ११ मतदारसंघात बंडखोर उभे करेन असा थेट इशारा दिलीप माने यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आणि आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर होत नसल्याने अस्वस्थ कार्यकर्ते माने यांच्या निवासस्थानी हजारोंच्या संख्येनी गर्दी केली. दिलीप माने ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असा नारा देत कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या. वातावरण तणावपूर्ण होत असताना काँग्रेसचे शहरध्यक्ष चेतन नरोटे यांनी माने यांच्या निवासस्थानी भेट देत संतप्त कार्यकर्त्याना शांत केले .

हे देखील वाचा : काँग्रेस पक्षाची संपूर्ण उमेदवारांची यादी आजच होणार जाहीर; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

अमर पाटील यांना शिवसेना उबाठाने उमेदवारी जाहीर करुन एबी फॉर्मही दिला. याच दरम्यान काही खलबते झाली. माजी आ. दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकांचा सपाटा सुरु केल्यावर काँग्रेसच्या हालचाली गतिमान झाल्या आणि माने यांना उमेदवारीसह एबी फॉर्म खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे सपूर्द केल्याचा निरोप शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना मिळाला. याची माहिती मिळताच माने समर्थकांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी ही जागा सेनेचीच आहे. अमर पाटील यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिल्याचे सांगितले. यामुळे दक्षिणच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.

शुक्रवारी सायंकाळी माजी आ. दिलीप माने यांच्या समर्थकांनी विधानसभेच्या निवडणुकीविषयी माने यांनी निर्णय घ्यावेत यासाठी बैठक घेतली. ही बैठक संपता क्षणी माने यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती खा. प्रणिती शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना दिली आणि याचवेळी शहराध्यक्ष नरोटे यांनी देखील माजी आ. माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगताच मोठा जल्लोष सुरू झाला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, जयकुमार माने, पृथ्वीराज माने, वसंतराव पाटील, श्रीशैल पाटील, गंगाधर बिराजदार, शावरप्पा वाघमारे, अप्पासाहेब काळे, सतिश दरेकर, आशिम शेख, शैलजा राठोड, सचिन व्हनमाने, योगीराज दिंडोरे, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कुबसंगे, रावसाहेब पाटील, प्रथमेश पाटील, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, सचिन गुंड, सिध्दाराम व्हनमाने, नंदकुमार अंत्रोळीकर, सरपंच जयश्री सगरे, विठ्ठल पाटील, शकील कुडले, माजी सरपंच कोमल करपे, लता जावीर, सुनील जाधव, प्रताप टेकाळे, नागण्णा बनसोडे, राहुल जाधव, अरुणकुमार बिराजदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?

 

महाविकास आघाडीतील नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच शिवसेना उबाठाची उमेदवारी अमर पाटील यांना देण्यात आली आहे. दिलीप माने यांच्याबाबत झालेला निर्णय कोणी घेतला. नाना पटोल, खा. संजय राऊत, जयंत पाटील यांनी सांगितला का? दक्षिणची उमेदवारी अमर पाटलांनाच राहणार आहे. उमेदवारी बदलण्याचा विषयच नाही.-
– अनिल कोकिळ, जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना उबाठा

 

खा. प्रणिती शिंदे आमच्या नेत्या आहेत. त्यांचा निरोप चेतन नरोटे यांच्यामार्फत मिळालेला आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. संजय राऊत यांनीही काही जागांबाबत निर्णय चुकला असेल तर दुरुस्ती करण्यात येईल असे सांगितले होते. माझ्याबाबत झालेला हा निर्णय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे
– दिलीप माने, माजी आमदार

Web Title: Tension in mahavikas aghadi after dilip mane of congress did not get candidature in solapur south

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 02:10 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Solapur News

संबंधित बातम्या

Pune News : भय इथले संपत नाही; सोलापूर-पुणे मार्गावर चार दिवसात तीन भीषण अपघात
1

Pune News : भय इथले संपत नाही; सोलापूर-पुणे मार्गावर चार दिवसात तीन भीषण अपघात

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन
2

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर
3

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
4

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.