Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरकार बदलण्याची आता वेळ आली, कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती सरकार द्यायचंय’; शरद पवारांचं मतदारांना आवाहन

शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या कशाने का होतात, यावरील उदाहरण दिले. राज्यातील भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरला नाही, त्यांनी सर्वसामान्य जनतेला विशेष करून महिलांना संरक्षण दिले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 17, 2024 | 12:20 PM
'सरकार बदलण्याची आता वेळ आली असून कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती सरकार द्यायचंय'; शरद पवारांचं आवाहन

'सरकार बदलण्याची आता वेळ आली असून कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती सरकार द्यायचंय'; शरद पवारांचं आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

कोरेगाव : राज्यातील महायुती सरकारच्या धोरणामुळे संपूर्ण देशाला जगविणारा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सरकारला या गोष्टी थांबवता येत नाहीत, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. सरकार बदलण्याची वेळ आली असून कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती राज्य सरकार द्यायचे आहे. कोरेगावातील शशिकांत शिंदे यांच्यासारखी कर्तृत्त्ववान माणसं या निवडणुकीत विजयी करावीत, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

हेदेखील वाचा : मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर रस्त्यावरील भंडारी मैदानावर शनिवारी शरद पवार यांची प्रचारसभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपसह सरकारवर आपल्या शैलीत टीका केली. व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह माजी आमदार बाबुराव माने, आमदार अरुण लाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या कशाने का होतात, यावरील उदाहरण दिले. राज्यातील भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरला नाही, त्यांनी सर्वसामान्य जनतेला विशेष करून महिलांना संरक्षण दिले नाही. अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. संपूर्ण देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग शेतमालाला योग्य किंमत मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे, हे महाराष्ट्राचे चित्र आता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. या सरकारला बदलायचे असेल तर कर्तृत्ववान माणसांच्या हाती राज्य देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

शशिकांत शिंदे सर्वसामान्य जनतेसाठी लढण्यास तयार

कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख नामोल्लेख टाळत शरद पवार यांनी मतदारसंघातील दहशतीबाबत भाष्य केले. शशिकांत शिंदे हे कसे योग्य उमेदवार आहे, याबाबत माहिती दिली. अनेक वर्ष सर्वसामान्य जनता आणि माथाडी कामगार यांच्यासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. एक-दोन निवडणुकीत त्यांना यश आले नाही, लोकसभा निवडणुकीत सामान्य जनता त्यांच्या पाठीशी होती. मात्र, निवडणूक चिन्हामुळे त्यांचा पराभव झाला, असे स्पष्ट करत शशिकांत शिंदे सर्वसामान्य जनतेसाठी लढण्यास तयार आहेत.

पाण्याच्या नावाखाली मतदारसंघात राजकारण सुरू

सध्या पाण्याच्या नावाखाली मतदारसंघात राजकारण सुरू आहे. मते द्या नाही तर पाणी देणार नाही, असा स्पष्ट इशारा विरोधकांकडून जनतेला दिला जातो. महाराष्ट्रातील पाणी वाटपाचा समतोल या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमुळे ढासळला असून, त्यांनी राज्यात पाण्यावरून संघर्ष वाढवला असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला.

हेदेखील वाचा : बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता अन् त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचे टीकास्त्र

Web Title: Time has come to change the government says sharad pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 12:20 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण
1

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!
2

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान
3

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.