rupindar kour

शेतकऱ्यांना सेलेब्रेटींसह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यात पंजाबी गायक, अभिनेता दिलजीत दोसांज आणि गायिका रूपिंदर हांडा हे पहिल्यापासून शेतकऱ्यांना मदत करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यांनी पाठिंबा दिला आहे. अलिकडेच रुपिंदरने या शेतकऱ्यांसाठी स्वत:च्या हाताने जेवण तयार केल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरीयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. २६ नोव्हेंहरला शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली. अद्याप हे आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना सेलेब्रेटींसह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यात पंजाबी गायक, अभिनेता दिलजीत दोसांज आणि गायिका रूपिंदर हांडा हे पहिल्यापासून शेतकऱ्यांना मदत करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यांनी पाठिंबा दिला आहे. अलिकडेच रुपिंदरने या शेतकऱ्यांसाठी स्वत:च्या हाताने जेवण तयार केल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

रुपिंदरच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शेतकऱ्यांसाठी लंगर करत आहे. त्यासाठी तीने स्वत:च्या हाताने ब्रेड पकोड्यासाठी बेसनाचं पीठ तयार केलं आहे. तर दुसरीकडे ती रोटी करताना दिसत आहे. सध्या रुपिंदर टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेली आहे.

हा व्हिडिओ शेअर करत रुपिंदर लिहीते, “टिकरी बॉर्डवर आज लंगर सेवा करण्याची संधी मिळत आहे. वाहेगुरु भला करे”, असं कॅप्शन रुपिंदरने या व्हिडीओला दिलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

१२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आलय.