Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?

3 Monkeys: अर्जुन रामपाल, विशाल जेठवा आणि तेन्झिन दलहा स्टारर अब्बास-मस्तान यांचा थ्रिलर ४ डिसेंबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे. ‘ईठा’सोबत बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 04, 2026 | 11:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

3 Monkeys:  बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या आगामी ‘3 Monkeys’ या थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टरही रिलीज केला आहे. अब्बास-मस्तान या प्रसिद्ध दिग्दर्शक जोडीच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ‘3 Monkeys’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘3 Monkeys’मध्ये दिसणार नवी त्रिकूट

या चित्रपटात अर्जुन रामपालसोबत विशाल जेठवा, मुस्तफा बर्मावाला आणि तेन्झिन दलहा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशाल जेठवा ‘अमर’, मुस्तफा बर्मावाला ‘अकबर’, तर तेन्झिन दलहा ‘अँथनी’ची भूमिका साकारत आहे. अर्जुन रामपाल ‘संजय’च्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये या तीन पात्रांची झलक पाहायला मिळते. मात्र, त्यांच्या कथेबद्दल निर्मात्यांनी अद्याप फारशी माहिती समोर आणलेली नाही. त्यामुळे ‘अमर-अकबर-अँथनी’ची नेमकी कथा काय आहे, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ! माधुरींच्या चाहत्याने केला भन्नाट डान्स

‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका…’चा बदलला अर्थ

गांधी जयंतीच्या निमित्ताने ‘3 Monkeys’ची घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये प्रसिद्ध ‘थ्री मंकीज’ संकल्पनेला नव्या अंदाजात सादर करण्यात आलं आहे.

‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका’ या पारंपरिक संदेशाऐवजी चित्रपटात ‘सगळं पाहा, स्वतःचं ऐका आणि निर्भयपणे बोला’ अशी नवी टॅगलाइन पाहायला मिळते. अब्बास-मस्तान यांनी या तीन पात्रांना आजच्या पिढीच्या विचारसरणीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

अब्बास-मस्तान पुन्हा घेऊन येतायत थ्रिलर

‘बाजीगर’, ‘रेस’ आणि ‘अजनबी’ यांसारख्या थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अब्बास-मस्तान यांची ‘3 Monkeys’च्या निमित्ताने पुन्हा एकदा थ्रिलर जॉनरमध्ये एन्ट्री होत आहे. चित्रपटातील रहस्य आणि कथानकाबाबत सध्या गुप्तता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मोशन पोस्टरनंतर चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

‘ईठा’सोबत बॉक्स ऑफिसवर होणार क्लॅश

‘3 Monkeys’ ४ डिसेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी श्रद्धा कपूर स्टारर ‘ईठा’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे.

आता अर्जुन रामपालचा थ्रिलर आणि श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ यापैकी प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: 3 monkeys arjun rampal eetha box office clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • entertainment
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Yami Gautam-Adinath Kothare: पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार यामी-आदिनाथ; अभिनेत्रीने सांगितला कामाचा अनुभव
1

Yami Gautam-Adinath Kothare: पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार यामी-आदिनाथ; अभिनेत्रीने सांगितला कामाचा अनुभव

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..
2

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला
3

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”
4

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.