Kon Hoar Karodpati : (फोटो- सोशलमीडिया) Kon Hoar Karodpati : (फोटो- सोशलमीडिया)
सगळीकडे सध्या ‘कोण होणार करोडपती शो ची चर्चा आहे. यावेळी हा शोमध्ये अजून काहीतरी खास आहे. यंदा शोमध्ये सगळ्यांची लाडकी धक-धक गर्ल माधुरी दीक्षित शोचे सूत्रसंचालन करतीये. नव्या पर्वाचा पहिला प्रोमो समोर येताच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. पहिल्याच दिवशी जळगावामधील एक स्पर्धेक प्रथम हॉर्ट सिटवर बसणार आहे. Kon Hoar Karodpati :
जळगावच्या शरद राजपूत यांना हॉट सीटवर पहिली बसायची संधी मिळाली. त्यांच्यासाठी ही फक्त एक संधी नव्हती तर स्वप्नपूर्तीच होती. कारण शरद हे माधुरी दीक्षित यांचे खूप मोठे फॅन आहेत. इतके मोठे फॅन की त्यांनी टी-शर्टवर पण माधुरीचाच फोटो प्रिंट करुन घेतला आहे. ज्यावेळेस त्यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी आनंदाच्या भरात थेट आपला ब्लेझर काढला आणि सेटवरच नाचायला लागले. नाचताना त्यांच्या टी-शर्टवरचा माधुरीचा फोटो सगळ्यांना दिसला. तो क्षण सर्वासाठी आनंदाचा ठरला. प्रत्यक्षात माधुरी उभी आहे आणि टी-शर्टवर पण माधुरी, हा योगायोगच होता. माधुरीने पण त्यांचं हसून स्वागत केलं. तिला पण त्यांचा हा अंदाज खूप आवडला. ‘ती फक्त ऐकते की ऐकवते पण?’ –
Sony Marathi: ‘कोण होणार करोडपती’ मध्ये येण्यामागचं कारण ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने केलं स्पष्ट
या भागात एक खूप धमाल किस्सा पण घडला. माधुरीने शरद यांना त्यांच्या बायकोबद्दल विचारलं. त्यावर शरद लगेच हसून म्हणाले, “ती माझं सगळं ऐकते.”हे ऐकताच माधुरीने लगेच त्यांची फिरकी घेतली. ती मिश्किलपणे म्हणाली, “ती फक्त ऐकते की कधीकधी ऐकवते देखील?”माधुरीचा हा प्रश्न ऐकून अख्ख्या सेटवर एकच हशा पिकला. शरद पण लाजले आणि सगळे प्रेक्षक खळखळून हसले. माधुरीच्या या दिलखुलास अंदाजामुळेच हा शो अजून रंगतदार होणार आहे हे नक्की.
View this post on Instagram
या वेळचा ‘कोण होणार करोडपती’ खूप वेगळा असणार आहे. माधुरी दीक्षित पहिल्यांदाच हा शो होस्ट करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसोबतच्या गप्पा, त्यांच्या भावूक कथा आणि असे धमाल क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माधुरी फक्त प्रश्न विचारणार नाही तर स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे, त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी जाणून घेणार आहे. त्यामुळे प्रत्येक भाग हा काहीतरी नवीन शिकवणारा आणि मनाला भिडणारा असणार आहे.जळगावच्या शरद यांच्या सारखेच अनेक सामान्य लोक या मंचावर येऊन आपलं नशीब आजमावणार आहेत. कोण करोडपती होणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.तर मग विसरू नका, ‘कोण होणार करोडपती’ चं नवं पर्व सुरू होतंय 12 ऑक्टोबरपासून. दर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठी आणि Sony LIV वर. माधुरीसोबतचा हा नवा प्रवास नक्की पाहा.






