Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा

Aamir Khan: आमिर खान आता लवकरच ‘कौन बनेगा करोडपती सीझन १८’ (KBC 18) मध्ये दिसणार आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून आमिर खानच्या चौथ्या लग्नाची चर्चा जोरदार रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 09, 2026 | 09:21 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री
  • आमिरच्या लग्नावरून युजर्सनी केली ट्रोलिंग
  • प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर चौथ्या लग्नाची चर्चा
Aamir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिर खानने ५ जुलै २०२६ रोजी गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा खासगी विवाहसोहळा पार पडला. विशेष विवाह कायद्यानुसार या विवाहाची नोंदणी करण्यात आली. लग्नानंतर आमिरला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

दरम्यान, आमिर खान आता लवकरच ‘कौन बनेगा करोडपती सीझन १८’ (KBC 18) मध्ये दिसणार आहे. या विशेष भागात त्याच्यासोबत सनी देओल आणि प्रीती झिंटा देखील सहभागी होणार आहेत. हे तिघेही अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या आगामी ‘पार्टिशन १९४७’ या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहेत. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

KBC 18च्या प्रोमोमध्ये आमिर-अमिताभची खास बातचीत

KBC 18चा नवा प्रोमो नुकताच समोर आला असून त्यात आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मजेशीर संवाद पाहायला मिळतो. आमिर खान शोच्या ‘सोचना पड़ेगा’ या थीमबद्दल अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारताना दिसतो.

आमिर विचारतो, “तुम्ही प्रोमोमध्ये ‘सोचना पड़ेगा ’ म्हणालात, तर तुम्हाला कशाबद्दल विचार करावा लागेल?”

यावर अमिताभ बच्चन आपल्या खास शैलीत उत्तर देतात की, यावेळी शो सोपा नसेल आणि स्पर्धकांना आपल्या बुद्धीचा वापर करावा लागेल. त्यावर आमिर हसत म्हणतो, “तुम्हाला विचार करावा लागेल, सर… तुम्हाला खरंच विचार करावा लागेल.”

आमिरच्या लग्नावरून युजर्सनी केली ट्रोलिंग

आमिर आणि अमिताभ यांच्यातील हा संवाद पाहून अनेक चाहते मनोरंजन घेत असले, तरी सोशल मीडियावर काही युजर्सनी पुन्हा एकदा आमिरच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय काढला.

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याला विचारा की तो चौथ्यांदा लग्न कधी करणार आहे?” तर दुसऱ्याने, “तो इथे स्वतःच्या लग्नाबद्दल बोलायला आला आहे का?” अशी कमेंट केली.

काही युजर्सनी तर आमिरच्या संवादाचा संदर्भ घेत मजेशीरपणे त्याला स्वतःच्या लग्नाबाबतच ‘विचार करावा लागेल’, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे KBC 18चा हा प्रोमो प्रदर्शित होताच आमिरच्या तिसऱ्या लग्नाची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Amey Wagh: TVFचा पहिला मराठी चित्रपट जाहीर; अमेय वाघसह ‘या’ कलाकारांची फौज, नावही भन्नाट!

 

५ जुलैला गौरी स्प्रॅटशी केलं तिसरं लग्न

आमिर खानने ५ जुलै २०२६ रोजी गौरी स्प्रॅटशी लग्न केलं. मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी हा विवाहसोहळा अत्यंत साध्या आणि खासगी पद्धतीने पार पडला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यानंतर दोघांनी विशेष विवाह कायद्यानुसार आपल्या लग्नाची नोंदणी केली.

हे आमिर खानचं तिसरं लग्न आहे. यापूर्वी त्याने रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी विवाह केला होता. आता KBC 18च्या प्रोमोमुळे आमिरच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगली आहे.

पडद्यावरची लेक झाली खऱ्या आयुष्यातही खास; अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका

Web Title: Aamir khan enters kbc 18 social media buzz about his fourth marriage after promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • amitabh bachchan
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
1

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक
2

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
3

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज
4

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.