अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत उमेश जगताप यांनी मितालीच्या कस्तुरी या भूमिकेसोबत उमेश यांनी तिच्यासोबत वडिलांची भूमिका केली होती. सुरुवातीला ही फक्त अभिनयाची गरज होती. मात्र, मालिकेचं काम पुढे जात असताना दोघांमध्ये छान जिव्हाळा निर्माण झाला. सेटवरचं हे नातं नंतर खऱ्या आयुष्यातही कायम राहिलं.
मितालीनेही उमेश यांना केवळ मालिकेतील वडील म्हणून पाहिलं नाही. तिने त्यांना आपल्या खऱ्या आयुष्यात वडिलांसारखं स्थान दिलं. शूटिंग संपल्यानंतर कलाकार आपापल्या कामात व्यस्त होतात, पण काही नाती मात्र तिथेच थांबत नाहीत. उमेश आणि मिताली यांचं नातं त्यापैकीच एक ठरलं. मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नाचा दिवस या नात्याला एक वेगळीच उंची देणारा ठरला. आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवशी मितालीने उमेश यांना एक खास जबाबदारी दिली. तिच्या खऱ्या वडिलांसोबत उमेश जगताप यांनीही तिचं कन्यादान केलं.
उमेश यांनी एका मुलाखतीत या आठवणीबद्दल सांगितलं होतं. मितालीचं लग्न ठरल्यावर तिने स्वतः उमेश यांच्याकडे कन्यादान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा क्षण केवळ एका कलाकाराच्या लग्नातील विधी नव्हता, तर स्वतःच्या मुलीच्या आयुष्यातील मोठा प्रसंग असल्यासारखा होता.
View this post on Instagram
उमेश यांनी सांगितलं की, त्यांना स्वतःची मुलं नाहीत. मात्र, त्यांच्या भावाची दोन मुलं आहेत आणि त्यांनी त्या दोघांना नेहमीच आपल्या मुलांसारखं प्रेम दिलं. त्यामुळे मितालीसोबत तयार झालेलं नातंही त्यांच्यासाठी खूप भावनिक आहे. अभिनयाच्या निमित्ताने भेटलेली ही मुलगी पुढे त्यांच्या कुटुंबाचा एक भागच बनली. कलाकार भूमिका करतात, संवाद बोलतात आणि कॅमेरा बंद झाला की सगळं मागे राहतं. पण कधी कधी त्या भूमिकांमधून तयार झालेल्या भावना मात्र मनात राहतात. मिताली आणि उमेश यांच्या बाबतीतही असंच झालं. मालिकेतील बाप-लेकीचं नातं प्रत्यक्ष आयुष्यातही तितकंच घट्ट झालं.
All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…
उमेश यांच्यासाठी हा अनुभव विशेष होता. स्वतःची मुलगी नसतानाही एका मुलीच्या लग्नात तिचं कन्यादान करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातही ती मुलगी म्हणजे आपल्याशी आधीपासून भावनिक नातं जोडलेली मिताली होती. त्यामुळे त्या दिवसाची आठवण त्यांच्या मनात कायमची कोरली गेली. मनोरंजनविश्वात प्रसिद्धी, शूटिंग आणि स्पर्धा यांच्यासोबत माणुसकीची अनेक नातीही तयार होतात.
उमेश आणि मिताली यांची गोष्ट त्याचं साधं उदाहरण आहे. एका मालिकेत साकारलेली भूमिका इतकी मनापासून जगली गेली की तिचं नातं पडद्याबाहेरही टिकून राहिलं. आजही या बाप-लेकीच्या नात्यातील आपुलकी अनेकांसाठी भावणारी आहे.






