Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinyar Tirandaz Passes Away: ‘जबान संभाल के’ फेम अभिनेते दिनयार तिरंदाज काळाच्या पडद्याआड, 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘जबान संभाल के’ फेम अभिनेते दिनयार तिरंदाज यांचे 69 व्या वर्षी निधन झाले आहे. टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 12, 2026 | 09:15 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

ज्येष्ठ अभिनेते दिनयार तिरंदाज यांचे निधन झाले आहे. गुरुवारी सोशल मीडियावर ही बातमी पसरताच त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले. या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाची बातमी एका पारसी झोरोस्ट्रियन फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आली.

गुरुवारी, पारसी झोरोस्ट्रियन वर्ल्डवाइड फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले की, “कै. रुस्तम तिराद यांचे बंधू श्री. दिनयार तिरंदाज यांचे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ३:४५ वाजता मुंबईतील वाडिया बंगलो येथे होईल.” या पोस्टवर चाहत्यांनीही अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

या लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये केले होते काम

दिनयार तिरंदाज अनेक दशकांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘दुनिया’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ‘नुक्कड’ आणि ‘ब्योमकेश बक्षी’ यांसारख्या गाजलेल्या दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले होते.

‘३७० ची बिर्याणी’ विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; डीजीपींना कडक कारवाईचे आदेश

‘जुबान संभल के’ या विनोदी मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले.

दिनयार तिरंदाज यांची एक चरित्र अभिनेता म्हणून मोठी ख्याती होती. १९९० च्या दशकात, त्यांनी ‘जुबान संभाल के’ या सुपरहिट टीव्ही सिटकॉममध्ये ‘मिस्टर केकी दारूवाला’ यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे दिन्यार यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली.

दूरदर्शन व्यतिरिक्त, या ज्येष्ठ अभिनेत्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते. दिनयार तिरंदाज यांनी ‘हॅलो ब्रदर’, ‘अलबेला’, ‘चलते चलते’, ‘मैने प्यार क्यूँ किया’, ‘क्या कहना’, ‘दिल है के मानता नहीं’ आणि ‘कमाल धमाल मालामाल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दिनयार तिरंदाज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि विनोदी कलाकार सुरेश मेनन यांनी पोस्टवर “ओम शांती” असे लिहून प्रतिक्रिया दिली. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने हात जोडलेला इमोजी शेअर केला.

Web Title: Actor dinyar tirandaz has passed away at the age of 69

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Actor
  • bollywood movies
  • Death

संबंधित बातम्या

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
1

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

Haiwaan Box Office Collection: ‘हैवान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी घसरण; दोन दिवसांत ‘फक्त’ इतक्या कोटींची कमाई
2

Haiwaan Box Office Collection: ‘हैवान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी घसरण; दोन दिवसांत ‘फक्त’ इतक्या कोटींची कमाई

S. Sreesanth: बापाचे छत्र हरपले! माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे दुःखद निधन
3

S. Sreesanth: बापाचे छत्र हरपले! माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे दुःखद निधन

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा
4

Haiwaan Movie Review: सायकॉलॉजिकल थ्रिलरचा नवा अध्याय: ‘हैवान’ चित्रपटाचा सविस्तर आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.