Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Vaishnavi Kalyankar : “माणसासारखी आकृती दिसली अन्…”, वैष्णवीने रात्री २:३० वाजता केला पती किरण गायकवाडला फोन, म्हणाली…

अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने तिच्या आयुष्यातील एक थरारक अनुभव शेअर केला आहे. पेट्रोल पंपाजवळ दिसलेल्या विचित्र आकृतीनंतर ती इतकी घाबरली की मध्यरात्री पती किरण गायकवाडला फोन केला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 25, 2026 | 12:04 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

तिकळी, काजळमाया आणि देवमाणूस २ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सध्या तिच्या ‘घबाडकुंड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रहस्य आणि थराराने भरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही तो चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत वैष्णवीने तिच्या आयुष्यात घडलेला एक भीतीदायक अनुभव शेअर केला आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत वैष्णवीला, “तुझ्या आयुष्यात कधी एखादा रहस्यमय किंवा थरारक अनुभव आला आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अभिनेत्रीने एक असा किस्सा सांगितला, जो ऐकून अनेकांच्या अंगावर काटा येईल.

वैष्णवीने सांगितलं की,”एका प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी आम्ही कोल्हापूर की नागपूरला जात होतो. नेमकं लोकेशन आता आठवत नाही. प्रवासादरम्यान आमची गाडी एका पेट्रोल पंपावर थांबली. त्या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण मोकळी जागा होती. तिथे मला एक माणसासारखी आकृती सतत फेऱ्या मारताना दिसली.”

ती पुढे म्हणाली, “मी गाडीत झोपले होते. बाकीचे मला म्हणाले, खाली ये… तिथे बघ काहीतरी आहे. मी खाली उतरले आणि त्या दिशेने पाहिलं. मग आम्ही कोण आहे हे पाहण्यासाठी थोडं पुढे गेलो. पण, त्या आकृतीकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नव्हती. ती फक्त तशाच फेऱ्या मारत होती. ते पाहून माझी धडधड वाढली. मी लगेच म्हटलं, ‘आता यापुढे मी जाणार नाही.’ त्यानंतर आम्ही तिथून निघालो.”

वैष्णवीने सांगितलं की, गाडीत बसल्यानंतरही तिचं लक्ष त्या आकृतीकडेच होतं. “गाडी निघाल्यानंतरही ती आकृती तशीच फेऱ्या मारताना दिसत होती. त्यानंतर आम्ही रात्री हॉटेलवर पोहोचलो. मी एकटीच मुलगी असल्याने मला वेगळी रूम देण्यात आली होती. रात्री साडेबारा वाजले होते, पण मी पाहिलेल्या त्या प्रसंगाचा भास सतत होत होता,” असं तिने सांगितलं.

Guru Randhawa Gym Firing Case: गोळीबार करणारे बिश्नोई गँगचे आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी; दोघेही पोलिसांच्या ताब्यात

वैष्णवी पुढे म्हणाली, “डोळे बंद केल्यावर तेच भास होत होते. मला डोळे बंद करायचीही भीती वाटू लागली होती. मी देवाचं नाव घेत झोपण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या झोप लागत नव्हती. ” भीती इतकी वाढली की, शेवटी तिने रात्री अडीच-तीनच्या सुमारास पती आणि अभिनेता किरण गायकवाड याला फोन केला. “मी किरणला फोन करून सांगितलं की, मला खूप भीती वाटतेय आणि सतत विचित्र भास होत आहेत. त्यावेळी किरण सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळत होता. त्याने मला सल्ला दिला की, खोलीतील सगळे दिवे सुरू कर आणि शांत झोपण्याचा प्रयत्न कर,” असं वैष्णवीने सांगितलं.

Premala Conditions Apply Review: प्रेम, करिअर अन् ‘नो डेटिंग’चा ट्विस्ट; कशी आहे ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’?

मात्र, खोलीतील सर्व लाइट्स सुरू करूनही तिची भीती कमी झाली नाही. “सगळे दिवे लावले तरी मला झोपायची हिंमत होत नव्हती. शेवटी सकाळी साडेसहा वाजता कुठेतरी झोप लागली. त्यानंतर आठ वाजता उठून आवरलं आणि प्रमोशनसाठी गेले,” असा खुलासा अभिनेत्रीने केला.

वैष्णवीने सांगितलेला हा अनुभव ऐकून अनेक चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, तिचा ‘घबाडकुंड’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करत आहे.

Web Title: Actress vaishnavi kalyankar shared a chilling experience from her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • horror story
  • marathi actress

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.