Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मर्दिनी’मधून अहमद खान यांचं मराठीत पदार्पण; आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष

‘मर्दिनी’ चित्रपटातील विशेष गीताला अहमद खान यांची पहिली मराठी कोरिओग्राफी लाभली आहे. आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात साकारलेले हे गीत स्त्रीशक्ती आणि मातृत्वाचा प्रेरणादायी संदेश देणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 11, 2026 | 04:23 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

आगामी मराठी चित्रपट मर्दिनी सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता चित्रपटातील एका खास गीतामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या गीताच्या निमित्ताने बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खान यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. विशेष म्हणजे या गीताला गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे.

अहमद खान यांनी या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, ‘मर्दिनी’ हे केवळ एक गाणं किंवा चित्रपट नसून भावनांचा, श्रद्धेचा आणि स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा प्रवास आहे. चित्रपटाच्या कथेशी आणि त्यातील भावविश्वाशी ते सहज जोडले गेले. मराठी चित्रपटासाठी प्रथमच काम करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नारीसामर्थ्य, मातृत्व आणि संघर्षाची कहाणी मांडणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट समाजाने घालून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे. चित्रपटातील शीर्षक गीत या भावनांना अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले आणि बालकलाकार मायरा वैकुळ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे कथेला अधिक प्रभावी परिमाण लाभले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अजय मयेकर यांनी केले असून, निर्मिती दिप्ती तळपदे यांची आहे. सहनिर्माती टिना राकेश कोठारी आहेत. छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक तसेच पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला सक्षम आधार दिला आहे.

Icchadhari Naagin : Zee आणि Star मध्ये स्पर्धा? ‘मी कात टाकली’ नंतर मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज

पोस्टर लॉन्चपासूनच चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मर्दिनी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. नारीशक्तीचा जयघोष, मातृत्वाच्या सामर्थ्याला सलाम आणि संकटांशी दोन हात करणाऱ्या स्त्रीच्या अदम्य जिद्दीची कहाणी घेऊन येणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरणार आहे. भावनिक कथानक, प्रभावी कलाकार, हृदयस्पर्शी संगीत आणि आशयपूर्ण मांडणी यांच्या जोरावर ‘मर्दिनी’ हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरण्याची चिन्हे आहेत. येत्या ३ जुलै २०२६ रोजी ही प्रेरणादायी कथा रुपेरी पडद्यावर अवतरणार असून, प्रेक्षकांच्या मनावर आपली अमिट छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे.

New Marathi Serial : थरार, रहस्य आणि भावनांची गुंफण; ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Web Title: Ahmed khan makes his marathi debut with mardini adarsh shindes powerful voice to celebrate the spirit of women empowerment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
2

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.