Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC School Diwali Holidays: BMC शाळांना यंदा दिवाळीची बंपर सुट्टी, 16 दिवस शाळा बंद राहणार, मुंबई महापालिकेचं परिपत्रक जाहीर

BMC School Diwali Holidays: मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने २०२६ मधील दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार मुंबईतील महापालिका आणि खासगी अनुदानित प्राथमिक शाळांना ५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान १६ दिवसांची दिवाळी सुट्टी मिळणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 01, 2026 | 10:32 AM
BMC School Diwali Holidays (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

BMC School Diwali Holidays (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील शाळांना दिवाळीची १६ दिवसांची सुट्टी.
  • ५ ते २३ नोव्हेंबरदरम्यान शाळा बंद.
  • २४ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुट्टी; शाळा २५ नोव्हेंबरला सुरू.

BMC Mumbai primary schools Diwali vacation circular : मुंबईत राहणाऱ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. यंदाची दिवाळी जास्तच खास होणार आहे. कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने 2026 च्या सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे आणि यात दिवाळीला तब्बल 16 दिवसांची मोठी सुट्टी देण्यात आली आहे. BMC School Diwali Holidays:

BMC च्या शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत परिपत्रक काढलं आहे. हे परिपत्रक मुंबईतील सगळ्या भाषांच्या मनपा शाळा आणि प्रायव्हेट अनुदानित प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवण्यात आलं आहे.

कधीपासून कधीपर्यंत आहे सुट्टी?

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा दिवाळीची सुट्टी गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. ही सुट्टी सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 पर्यंत असणार आहे. मध्ये 3 रविवार येतात, ते धरून एकूण 16 दिवस मुलांना शाळेत जावं लागणार नाही.आणि अजून एक भारी गोष्ट म्हणजे, सुट्टी संपल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी, 24 नोव्हेंबर 2026 ला गुरुनानक जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे शाळा थेट बुधवारी, 25 नोव्हेंबर 2026 ला सुरू होणार आहेत. म्हणजे मुलांना सलग आराम मिळणार आहे.

पालकांची मोठी सोय झाली

दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीच्या तारखा उशिरा कळतात, त्यामुळे गावी जाणाऱ्या लोकांचे हाल होतात. रेल्वेचं तिकीट मिळत नाही, बसचं बुकिंग फुल होतं. पण यंदा BMC ने अगोदरच तारखा जाहीर केल्यामुळे सगळ्यांना नियोजन करायला वेळ मिळणार आहे.

मुंबईत असे लाखो कुटुंब आहेत जे दिवाळीला कोकणात, खानदेशात, मराठवाड्यात आपल्या गावी जातात. त्यांच्यासाठी ही अगोदर जाहीर झालेली सुट्टी म्हणजे मोठा दिलासा आहे. आता ते आरामात रेल्वेचं रिझर्वेशन करू शकतात. शिक्षकांना पण आपल्या सुट्टीचं प्लॅनिंग करायला सोपं जाणार आहे.

School Diwali Vacation 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे …

प्रायव्हेट शाळांसाठी नियम काय?

या परिपत्रकात एक महत्त्वाची टीप पण देण्यात आली आहे. मुंबईत अशा बऱ्याच शाळा आहेत जिथे एकाच आवारात प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळा भरतात. अशा शाळांमध्ये कधी कधी सुट्ट्यांच्या तारखांमध्ये गोंधळ होतो.

त्यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाने सांगितलं आहे की, जर माध्यमिक विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्या आणि BMC च्या प्राथमिकच्या सुट्ट्यांमध्ये फरक असेल, तर संबंधित शाळा शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आपल्या 76 वार्षिक सुट्ट्यांच्या आत त्यात बदल करू शकतात.

तसेच, पुढे जाऊन सरकारने शाळांच्या सुट्ट्यांबाबत काही नवीन नियम काढले, तर त्यानुसार या वेळापत्रकात बदल करण्याचे सगळे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांकडे असतील.

दिवाळीची सुट्टी कमी झाली ना राव ! शिक्षक आणि पालकांचा संताप

एकंदरीत, या स्पष्ट वेळापत्रकामुळे शाळांचं वर्षभराचं नियोजन, परीक्षा आणि मुलांचे अभ्यासाचे दिवस सगळं सुरळीत पार पडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना यंदा दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईतील शाळांना दिवाळीची किती दिवस सुट्टी मिळणार आहे?

    Ans: मुंबईतील संबंधित शाळांना दिवाळीची एकूण १६ दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

  • Que: २०२६ मध्ये दिवाळीची सुट्टी कधीपासून सुरू होणार आहे?

    Ans: दिवाळीची सुट्टी गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.

  • Que: दिवाळीची सुट्टी कधी संपणार आहे?

    Ans: दिवाळीची सुट्टी सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे.

Web Title: Mumbai schools diwali vacation 2026 16 days holiday bmc rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • BMC
  • Maharshtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: संस्थाचालकांना लगाम; शिक्षक भरती होणार पारदर्शक! ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती, कौशल्य चाचणी
1

Mumbai News: संस्थाचालकांना लगाम; शिक्षक भरती होणार पारदर्शक! ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती, कौशल्य चाचणी

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन
2

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

Mumbai News: अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा
3

Mumbai News: अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा

Mumbai News: गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा! पात्र कुटुंबांचे पुनर्वसन; रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा होणार विस्तार
4

Mumbai News: गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा! पात्र कुटुंबांचे पुनर्वसन; रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा होणार विस्तार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.