Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; इटलीतील सुंदर ठिकाणी केलं खास फोटोशूट, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Alanna Panday Pregnant: अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे दुसऱ्यांदा आई होणार आहे. पती आयव्हर मॅकक्रे आणि मुलगा रिव्हरसह इटलीतील सिसिलीमध्ये खास प्रेग्नन्सी फोटोशूट केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 09, 2026 | 12:18 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्यांदा आई होणार अलाना पांडे
  • इटलीतील सिसिलीमध्ये केलं खास प्रेग्नन्सी फोटोशूट
  • अनन्या पांडेने दिल्या खास शुभेच्छा
Alanna Panday Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अलाना पांडे दुसऱ्यांदा आई होणार असून, तिने सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. अलानाने पती आयव्हर मॅकक्रे आणि मुलगा रिव्हरसह हा खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

इटलीतील सिसिलीमध्ये केलं खास प्रेग्नन्सी फोटोशूट

अलाना पांडे आणि आयव्हर मॅकक्रे सध्या इटलीतील सिसिली येथे आहेत. याच सुंदर ठिकाणी त्यांनी दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा करणारा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये अलाना पांढऱ्या रंगाचा, हलक्या केशरी फुलांच्या डिझाइनचा बॅकलेस गाऊन परिधान केलेली दिसत आहे.

या स्टायलिश आउटफिटमध्ये तिने बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. आयव्हर तिच्या बेबी बंपवर प्रेमाने हात ठेवताना दिसत असून, त्यांचा मुलगा रिव्हरही या खास व्हिडिओमध्ये सहभागी झाला आहे. “प्रेमात आणखी एक सदस्य” असं कॅप्शन देत अलाना आणि आयव्हरने ही गुड न्यूज शेअर केली.

२०२३ मध्ये झालं होतं लग्न

अलाना पांडेने अमेरिकन फिल्ममेकर आयव्हर मॅकक्रे यांच्यासोबत १६ मार्च २०२३ रोजी मुंबईत लग्न केलं. मे २०२४ मध्ये या जोडप्याच्या आयुष्यात मुलगा रिव्हर याचं आगमन झालं. आता रिव्हर मोठा भाऊ होणार असून, अलाना आणि आयव्हरच्या कुटुंबात पुन्हा एकदा चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

अनन्या पांडेने दिल्या खास शुभेच्छा

अलाना ही अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण आहे. अलानाने प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर अनन्यानेही ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. तिने अनेक लाल हार्ट आणि नजर लागू नये यासाठीच्या इमोजीसह अलाना आणि आयव्हरचं अभिनंदन केलं.

याशिवाय डिनो मोरिया, लारा दत्ता आणि अनुषा दांडेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अलानाच्या पोस्टवर कमेंट करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

Deepika Padukone: ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या मीनम्माचे ५ आयकॉनिक डायलॉग्स; दीपिका पदुकोणच्या या भूमिकेने जिंकली चाहत्यांची मनं

अलानाची आईही होणार दुसऱ्यांदा आजी

अलाना पांडेची आई दियान पांडे यांनीही या गुड न्यूजवर आनंद व्यक्त केला. त्यांनी कमेंट करत “दुसऱ्यांदा आजी होणार. देव तुला आशीर्वाद देवो” असं लिहिलं. यासोबत त्यांनी हार्ट, हग आणि आनंदाश्रूंचे इमोजीही शेअर केले.

अलानाच्या या गुड न्यूजमुळे पांडे कुटुंबात आनंदाचं वातावरण असून, चाहत्यांकडूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Aamir Khan: ‘चौथं लग्न कधी करणार?’, KBC 18मध्ये आमिर खानची एंट्री; प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चौथ्या लग्नाची चर्चा

Web Title: Alanna panday announces she is pregnant with second baby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Ananya Pandey
  • Entertainemnt News
  • Pregnant

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.