(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
दरम्यान, आमिर खान आता लवकरच ‘कौन बनेगा करोडपती सीझन १८’ (KBC 18) मध्ये दिसणार आहे. या विशेष भागात त्याच्यासोबत सनी देओल आणि प्रीती झिंटा देखील सहभागी होणार आहेत. हे तिघेही अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या आगामी ‘पार्टिशन १९४७’ या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहेत. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
KBC 18चा नवा प्रोमो नुकताच समोर आला असून त्यात आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मजेशीर संवाद पाहायला मिळतो. आमिर खान शोच्या ‘सोचना पड़ेगा’ या थीमबद्दल अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारताना दिसतो.
आमिर विचारतो, “तुम्ही प्रोमोमध्ये ‘सोचना पड़ेगा ’ म्हणालात, तर तुम्हाला कशाबद्दल विचार करावा लागेल?”
यावर अमिताभ बच्चन आपल्या खास शैलीत उत्तर देतात की, यावेळी शो सोपा नसेल आणि स्पर्धकांना आपल्या बुद्धीचा वापर करावा लागेल. त्यावर आमिर हसत म्हणतो, “तुम्हाला विचार करावा लागेल, सर… तुम्हाला खरंच विचार करावा लागेल.”
आमिर आणि अमिताभ यांच्यातील हा संवाद पाहून अनेक चाहते मनोरंजन घेत असले, तरी सोशल मीडियावर काही युजर्सनी पुन्हा एकदा आमिरच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय काढला.
एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याला विचारा की तो चौथ्यांदा लग्न कधी करणार आहे?” तर दुसऱ्याने, “तो इथे स्वतःच्या लग्नाबद्दल बोलायला आला आहे का?” अशी कमेंट केली.
काही युजर्सनी तर आमिरच्या संवादाचा संदर्भ घेत मजेशीरपणे त्याला स्वतःच्या लग्नाबाबतच ‘विचार करावा लागेल’, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे KBC 18चा हा प्रोमो प्रदर्शित होताच आमिरच्या तिसऱ्या लग्नाची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
Amey Wagh: TVFचा पहिला मराठी चित्रपट जाहीर; अमेय वाघसह ‘या’ कलाकारांची फौज, नावही भन्नाट!
View this post on Instagram
आमिर खानने ५ जुलै २०२६ रोजी गौरी स्प्रॅटशी लग्न केलं. मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी हा विवाहसोहळा अत्यंत साध्या आणि खासगी पद्धतीने पार पडला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यानंतर दोघांनी विशेष विवाह कायद्यानुसार आपल्या लग्नाची नोंदणी केली.
हे आमिर खानचं तिसरं लग्न आहे. यापूर्वी त्याने रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी विवाह केला होता. आता KBC 18च्या प्रोमोमुळे आमिरच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगली आहे.
पडद्यावरची लेक झाली खऱ्या आयुष्यातही खास; अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका






