Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिर्झापूर: द मूव्ही’वर अली फजलचा मोठा खुलासा; गुड्डू पंडितची प्रतिक्रिया ठरतेय चर्चेचा विषय

‘मिर्झापूर: द मूव्ही’बाबत अली फजलने मोठा खुलासा केला असून गुड्डू पंडितची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 31, 2026 | 01:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

गाजलेल्या वेबसीरिज ‘मिर्झापूर’चा थरार आता मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. Amazon MGM Studios आणि Excel Entertainment यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिर्झापूर: द मूव्ही’ तयार करण्यात येत असून, हा प्रोजेक्ट भारतीय ओटीटी इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी वेबसीरिजपैकी एक असलेल्या ‘मिर्झापूर’चे हे पहिलेच चित्रपट रूपांतर आहे. या चित्रपटाद्वारे मालिकेच्या जगाला सिनेमॅटिक स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणले जाणार आहे.

‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, चाहत्यांमध्ये या घोषणेमुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘मिर्झापूर: द मूव्ही’बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेली ही मालिका आता मोठ्या पडद्यावर नव्या भव्यतेसह सादर होणार आहे. मालिकेतील दमदार ॲक्शन, नाट्य, लक्षवेधी संवाद आणि सत्तासंघर्ष यांचा अनुभव प्रेक्षकांना यावेळी अधिक व्यापक स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी गुड्डू पंडितची भूमिका साकारणारे Ali Fazal यांनी या प्रकल्पाबाबत आपले विचार व्यक्त केले. मालिका ते चित्रपट हा प्रवास कसा वेगळा आहे, याविषयी बोलताना ते म्हणाले, “आम्ही नुकतेच चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. भारतात प्रथमच एखाद्या मालिकेचे चित्रपटात रूपांतर होत आहे. विशेष म्हणजे हा कोणत्याही भागाचा पुढील भाग नसून स्वतंत्र कथा असलेला चित्रपट आहे. पहिल्या पर्वातील मूळ कलाकार पुन्हा एकत्र आले आहेत आणि ही कथा अतिशय सुंदर पद्धतीने उलगडते. ज्यांनी ‘मिर्झापूर’ पाहिली नाही त्यांनाही हा चित्रपट सहज समजेल, तर मालिकेचे चाहतेही कथानकातील प्रत्येक गोष्ट योग्य वाटेल अशा पद्धतीने मांडण्यात आली आहे.”

Khatron Ke Khiladi 15 Promo: तुफानी टास्क-थरारक स्टंट्स! रोहित शेट्टीच्या इशाऱ्यामुळे वाढली उत्सुकता, स्पर्धकांना बसणार धक्का

बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ आता अधिकृतरीत्या मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात भव्य ॲक्शन सीक्वेन्सेस, धक्कादायक वळणे आणि सत्तासंघर्षांची नवी लढाई पाहायला मिळणार आहे. ‘मिर्झापूर’च्या विश्वाला या चित्रपटातून एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू यांसारखी लोकप्रिय पात्रे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यासोबतच काही नवीन कलाकार आणि पात्रांचा समावेश करण्यात आला असून, कथानकात नवीन आयाम निर्माण होणार आहेत.

Deool Band 2: स्वामींची भक्ती अपरंपार, देऊळ बंद २ च्या कलेक्शनमध्ये १० व्या दिवशी मोठी वाढ! रितेश देशमुखच्या चित्रपटाला टाकलं मागं

गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली आणि पुनीत कृष्णा यांच्या लेखनातून तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे.‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Ali fazal makes a big revelation about mirzapur the movie guddu pandits reaction becomes a talking point

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • OTT
  • Web Series

संबंधित बातम्या

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट
1

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा
2

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?
4

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.