Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट

आमिर खानचा सुपरहिट चित्रपट '3 Idiots' तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सोनम वांगचुक आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या या चित्रपटाच्या रि रिलीजची तारीख समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 21, 2026 | 12:44 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ पुन्हा थिएटरमध्ये
  • १७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर होणार पुनरागमन
  • सोनम वांगचुक आंदोलनामुळे चित्रपटाची जोरदार चर्चा
बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट ‘3 इडियट्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर आणि बोमन इराणी यांच्या दमदार अभिनयाने गाजलेला हा चित्रपट तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कधी प्रदर्शित होणार ‘3 इडियट्स’?

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’ पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा ब्लॉकबस्टर चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी पुन्हा चित्रपटगृहांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. एनएच स्टुडिओ आपल्या धोरणात्मक नियोजनाचा भाग म्हणून या चित्रपटाच्या भव्य पुन्हा प्रदर्शनाची तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे.

Ritesh-Genelia Deshmukh: ‘देशाच्या भविष्याचे…’, रितेश -जिनिलीया यांची एक्स पोस्ट व्हायरल; तरुणांच्या समर्थनार्थ मांडली ठाम भूमिका

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शिक्षण व्यवस्था, मैत्री आणि विद्यार्थ्यांवरील दबाव यांसारख्या विषयांवर भाष्य करत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सोनम वांगचुक आंदोलनामुळे पुन्हा चर्चेत आला चित्रपट

अलीकडेच ‘3 इडियट्स’ हा चित्रपट सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आला. आमिर खानने साकारलेलं ‘फुनसुख वांगडू उर्फ रांचो’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती.

या चर्चेला आणखी हवा मिळाली जेव्हा चित्रपटात ‘चतुर’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ओमी वैद्य यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, या दाव्यांवर आमिर खानने स्पष्टीकरण देत हे चुकीचं असल्याचं सांगितलं.

CJP Protest: मुलांना घेऊन जंतर-मंतर आंदोलनात पोहोचली ‘ही’ मराठी अभिनेत्री; व्हिडिओने वेधलं लक्ष

ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका कार्यक्रमात आमिर खानने सांगितलं की, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान त्यांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हती. तसेच दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि लेखक अभिजात जोशी यांनाही पटकथा लिहिताना वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणाऱ्या ‘3 इडियट्स’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Amid sonam wangchuks protest 3 idiots returns to theatres aamir khans film to make a comeback on the big screen after 17 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Entertainemnt News
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
1

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
2

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
3

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
4

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.