Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

King Movie Song: शाहरुख खान-दीपिकाची जोडी पुन्हा चर्चेत! ‘किंग’मधील पहिलं ‘कही जो तू मिल जाए’ गाणं प्रदर्शित

King Movie Song: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाए’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. गाण्यात शाहरुख-दीपिकाची रोमँटिक केमिस्ट्री, अॅक्शन सीन्स आणि शाहरुखचा शर्टलेस लूक पाहायला मिळतो.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2026 | 09:30 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

King Movie Song: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आज आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. शाहरुखच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘तू मिल जाए’ मध्यरात्री प्रदर्शित करण्यात आलं. हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे. शाहरुखच्या नव्या अंदाजाची आणि दीपिका पदुकोणसोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

‘तू मिल जाए’ गाण्यात शाहरुखचा रोमँटिक अंदाज

‘डंकी’ चित्रपटानंतर जवळपास तीन वर्षांनी शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी ‘किंग’ चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आता वाढदिवसाचं औचित्य साधत निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे.

‘तू मिल जाए’ या गाण्यात शाहरुख खानचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. गाण्याच्या सुरुवातीपासूनच त्याची खास शैली लक्ष वेधून घेते. अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतची त्याची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावत आहे. ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

रोमान्ससोबत अॅक्शनचाही तडका

या गाण्यात केवळ रोमान्सच नाही, तर अॅक्शनचीही झलक पाहायला मिळते. रोमँटिक दृश्यांसोबतच शाहरुख धोकादायक फाईट सीक्वेन्समध्ये दिसतो. काही दृश्यांमध्ये तो शस्त्रांच्या तस्करीशी संबंधित प्रसंगांतही दिसत असल्याचं गाण्यातून समोर येतं. विशेष म्हणजे, शाहरुखचा शर्टलेस लूकही या गाण्यात पाहायला मिळतो. त्यामुळे त्याच्या फिटनेसचीही चर्चा सुरू झाली आहे.

सुहाना खानसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘किंग’ चित्रपटाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटातून शाहरुख खान पहिल्यांदाच आपली मुलगी सुहाना खानसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सुहानासाठीही हा पहिला थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट ठरणार आहे.

या मल्टीस्टारर चित्रपटात शाहरुख आणि दीपिका यांच्यासोबत अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि राघव जुयाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

कधी प्रदर्शित होणार ‘किंग’?

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचा रोमँटिक अंदाज, अॅक्शन सीन्स आणि दमदार कलाकारांची फळी यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: King movie song kahi jo tu mil jaye release shah rukh khan deepika romantic chemistry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Deepika Padukone
  • entertainment
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?
1

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी
2

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

Honey Singh: रॅपर हनी सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कार अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, सोशल मीडियावर शेअर केली दुःखद बातमी
3

Honey Singh: रॅपर हनी सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कार अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, सोशल मीडियावर शेअर केली दुःखद बातमी

Subodh Bhave: प्रभासच्या ‘फौजी’मधून सुबोध भावे करणार तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; सेटवरील अनुभव सांगत केलं सुपरस्टारचं कौतुक
4

Subodh Bhave: प्रभासच्या ‘फौजी’मधून सुबोध भावे करणार तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; सेटवरील अनुभव सांगत केलं सुपरस्टारचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.