Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Khanvilkar: अनस्टॉपेबल अमृता खानविलकर! ग्लोबल ट्रेंडसेटरपासून बिग बजेट चित्रपटांपर्यंतचा प्रवास

नेटफ्लिक्सवरील ‘तस्करी’च्या जागतिक यशापासून ‘लग्न पंचमी’ नाटक आणि ‘अमूल्य’ या व्यवसायापर्यंत, अमृता खानविलकरने अवघ्या सहा महिन्यांत अनेक क्षेत्रांत यश मिळवलं आहे. आता ती अनुपम खेर यांच्यासोबत ‘रामभूमी’ चित्रपटात दिसणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 09, 2026 | 11:24 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि विविध क्षेत्रांतील यशामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच उद्योजिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अमृताने गेल्या सहा-सात महिन्यांत केलेली कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे.

अमृताचा नेटफ्लिक्सवरील डेब्यू ठरलेली ‘तस्करी’ ही वेब सिरीज जागतिक स्तरावर ट्रेंड झाली. या मालिकेतील तिने साकारलेली ‘मिताली कामत’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. मालिकेतील अॅक्शन आणि स्टंट सीक्वेन्समध्येही अमृताने दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे तिचे सर्वत्र कौतुक झाले.

ओटीटीनंतर अमृताने मराठी रंगभूमीवरही दमदार पाऊल टाकले. ‘लग्न पंचमी’ या नाटकातून तिने केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर निर्माती म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. या नाटकात तिने दुहेरी भूमिका साकारल्या असून अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. लवकरच ‘लग्न पंचमी’चा १०० वा प्रयोग सादर होणार असल्याची चर्चा आहे.

याच काळात अमृताने उद्योजिका म्हणूनही नवा प्रवास सुरू केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिने ‘अमूल्य’ या साडी ब्रँडची सुरुवात केली. हा केवळ व्यवसाय नसून प्रत्येक स्त्रीसाठी खास भावना आणि तिचं स्वप्न असल्याचं अमृता सांगते. अभिनय, निर्मिती आणि व्यवसाय अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वाटचाल करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशस्वी प्रवासाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, “स्त्रिया जन्मतःच उत्तम मल्टिटास्कर्स असतात. योग्य संधी आणि व्यासपीठ मिळालं तर त्या कोणतंही आव्हान समर्थपणे पेलू शकतात. गेल्या काही महिन्यांत मला नीरज पांडे, निपुण धर्माधिकारी आणि मधुगंधा कुलकर्णी यांसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

Milind Gawali : ‘जोड्या स्वर्गात बांधल्या जातात…’, 20 वर्षांनंतरही ‘तो’ क्षण विसरू शकले नाहीत मिलिंद गवळी; भावनिक पोस्ट चर्चेत

तिने पुढे सांगितले की, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका कामाख्या नारायण सिंग यांच्यासोबत काम करण्यासाठी ती उत्सुक आहे. “एक कलाकार म्हणून अशा दिग्दर्शकांसोबत काम करणं ही मोठी शिकवण असते,” असं ती म्हणाली.

Pravin Tarde on Trollers: त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला.., ‘देऊळ बंद 2’वर टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले..

दरम्यान, अमृताच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत ती आगामी ‘रामभूमी’ या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे अभिनय, रंगभूमी आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमध्ये यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या अमृता खानविलकरकडे सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Amruta khanvilkar unstoppable from global trendsetter to big budget films a remarkable journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.