• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Anand Pimpalakar In The Role Of The Villain In Ranpati Shivray Swari Agra

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

वास्तु व ज्योतिषशास्त्रातील अभ्यासपूर्ण मांडणीसाठी ओळखले जाणारे आनंद पिंपळकर आता अभिनयामुळे चर्चेत आहेत. १३ हून अधिक मराठी चित्रपटांनंतर ते ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 05, 2026 | 03:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वास्तु व ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे आणि अभ्यासपूर्ण, तर्कसंगत मांडणीसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध वास्तु-ज्योतिषी आनंद पिंपळकर आता पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. अध्यात्म, वास्तु आणि ज्योतिष या क्षेत्रांत आपली ठाम ओळख निर्माण करणाऱ्या आनंद पिंपळकर यांना अभिनयाचीही तितकीच ओढ आहे. या आवडीपोटी त्यांनी आजवर १३ हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सामाजिक, ऐतिहासिक आणि आशयघन चित्रपटांमध्ये दिसणारी त्यांची उपस्थिती नेहमीच लक्षवेधी ठरली आहे. आता त्यांच्या अभिनयाचा एक नवा, वेगळा आणि थोडासा धक्कादायक रंग प्रेक्षकांना बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मधून पाहायला मिळणार आहे.

‘गायकांना मोफत गाण्यास भाग पाडतात..’, अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर आता अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा भव्य चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवकालीन इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रोमांचक प्रसंगावर आधारित असलेल्या या चित्रपटात आनंद पिंपळकर यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सेवेत असलेला ‘उदयराज मुनशी’ हा व्यक्तिरेखेचा अवतार त्यांनी प्रभावीपणे सादर केला आहे. भूमिका आकाराने लहान असली, तरी तिचा प्रभाव कथानकात मोठा असून ती प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणारी आहे.

आतापर्यंत प्रामुख्याने सकारात्मक किंवा गंभीर भूमिका साकारणारे आनंद पिंपळकर यावेळी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी विशेष तयारी केली असून, ऐतिहासिक पार्श्वभूमी, व्यक्तिरेखेची मानसिकता आणि त्या काळातील राजकीय डावपेच यांचा सखोल अभ्यास केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे स्वतःसाठी गौरवाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “या चित्रपटाच्या निमित्ताने शिवकालीन इतिहासाच्या गौरवशाली पर्वाचा एक छोटासा भाग होता आले, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे,” असे ते म्हणाले.

Shubh Shravani: ‘आता येईल खरी मज्जा’ मोक्षाच्या लग्नादिवशी भूतकाळातील धक्कादायक सत्य उघड!

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रत्येक कलाकाराकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतल्याचे आनंद पिंपळकर आवर्जून सांगतात. ऐतिहासिक चित्रपट केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून ते इतिहासाची जाणीव करून देणारे असतात, असेही ते मानतात. शौर्य, रणनिती, राजकारण आणि स्वराज्याची प्रेरणा देणारा ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रदर्शित होत असून, आनंद पिंपळकर यांच्या खलनायकी भूमिकेमुळे चित्रपटाला आणखी वेगळे परिमाण मिळणार आहे.

Web Title: Anand pimpalakar in the role of the villain in ranpati shivray swari agra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:20 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

Feb 05, 2026 | 03:20 PM
ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव

ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव

Feb 05, 2026 | 03:18 PM
Dharashiv News: करजखेडा ग्रामपंचायत महाघोटाळा; ग्रामपंचायतीत तब्बल ७ कोटींचा भ्रष्टाचार उघड

Dharashiv News: करजखेडा ग्रामपंचायत महाघोटाळा; ग्रामपंचायतीत तब्बल ७ कोटींचा भ्रष्टाचार उघड

Feb 05, 2026 | 03:16 PM
रणबीर कपूरचा Animal Park करणार धमाका! चित्रपटाचे शूटिंग सुरु, अभिनेता साकारणार दुहेरी भूमिका

रणबीर कपूरचा Animal Park करणार धमाका! चित्रपटाचे शूटिंग सुरु, अभिनेता साकारणार दुहेरी भूमिका

Feb 05, 2026 | 03:09 PM
Kunkeshwar Temple: कुणकेश्वर यात्रेसाठी दक्षिण कोकणची काशी सजली

Kunkeshwar Temple: कुणकेश्वर यात्रेसाठी दक्षिण कोकणची काशी सजली

Feb 05, 2026 | 03:09 PM
भारतातील पहिलीवहिली सरकारी Bharat Taxi App आज लाँच, OLA-Ubers च्या तोंंडचे पळवणार पाणी

भारतातील पहिलीवहिली सरकारी Bharat Taxi App आज लाँच, OLA-Ubers च्या तोंंडचे पळवणार पाणी

Feb 05, 2026 | 03:05 PM
ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

Feb 05, 2026 | 03:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.