ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. तब्बलं तीन वर्षांनंतर शर्मिला पिंपळोलकर -गायकवाड या महापौर पदावर विराजमान झाल्या आहेत. भाजपचे कृष्णा पाटील हे उपमहापौर पदावर विराजमान झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पिठासीन अधिकारी डॉ कृष्णनाथ पांचाळ आणि निवडणूक अधिकारी व ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांनी तुळशीची रोपे देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सभागृहात सर्व 131 नगरसेवक उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्यासह शिवसेना भाजप नेत्यांच्या उपस्थितीत महापौर उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारण्यात आला.