कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेत महायुतीने सत्ता मिळवलीये..दोन्हीही महापालिकेत भाजपचा महापौर होणार असून कोल्हापूर महापालिकेसाठी रूपाराणी निकम यांचं नाव निश्चित झालंय.मात्र महापौर पदाचा कार्यकाळ किती असणार यावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.त्यामुळे यंदाही महापौर पदाची खांडोळी होणार का, की अडीच वर्ष एकच महापौर राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत दहा-दहा महिन्यांचा महापौर आणि उपमहापौराचा कार्यकाळ ठरवण्यात आला असून, त्यापाठोपाठ आता कोल्हापूर महानगरपालिकेतही या पदांची खांडोळी केली जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे..महापौर पदाच्या कालावधीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी देखील जे वरिष्ठांच्या मनात आहे त्याच पद्धतीने प्रक्रिया पूर्ण होईल असं सूचक वक्तव्य केलंय..लोकांच्या अपेक्षा जास्त असतात.आम्हालाही वाटत होतं की महापौर पदाची खांडोळी होत आहे…त्यावेळी आम्ही टीका करत होतो. मात्र आता लक्षात आलं आहे. लोकांना एकसंघ ठेवायच असेल तर पदही वाटून घ्यावी लागतात.त्यामुळे महापौर वर्षाचा, सव्वा वर्षाचा, पाच वर्षाचा असणार यापेक्षा प्रशासन एकसंघ ठेवून कसं काम करायचं हे मात्र महत्त्वाचं असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.शिवाय महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवली आहे.तिन्ही पक्षातील नगरसेवकांना संधी मिळावी पाहिजे असं तिन्ही पक्षांच मत आहे.मात्र महापौर पदाची जास्तीत जास्त खांडोळी होणार नाही यासाठी भाजपचा प्रयत्न असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय.