Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anant Nag: ‘KGF’मधील या दिग्गज अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; शबाना आझमीपासून रश्मिकापर्यंत गाजवल्या भूमिका

Anant Nag: ‘KGF’ फेम ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अनंत नाग यांनी विविध भाषांमधील 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेषतः कन्नड सिनेमातील त्यांच्या योगदानाची मोठी दखल घेतली जाते.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2026 | 12:50 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Anant Nag: भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी 2024 च्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत अनंत नाग यांनी विविध भाषांमधील 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेषतः कन्नड सिनेमातील त्यांच्या योगदानाची मोठी दखल घेतली जाते.

अनंत नाग यांचं खरं नाव काय?

अनंत नाग यांचं पूर्ण नाव अनंत नागरकट्टे असं आहे. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1948 रोजी कर्नाटकात झाला. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कन्नडसोबतच त्यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांमध्ये केलं काम

1970 आणि 1980 च्या दशकात अनंत नाग हे भारतीय सिनेमातील चर्चेतील अभिनेत्यांपैकी एक होते. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यासोबत त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘कलयुग’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या.

‘मालगुडी डेज’मुळे घराघरात पोहोचले

चित्रपटांसोबतच अनंत नाग यांनी टेलिव्हिजनवरही आपली वेगळी ओळख निर्माण केली. आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित लोकप्रिय मालिका ‘मालगुडी डेज’मध्ये त्यांच्या अभिनयाची आजही आठवण काढली जाते. या मालिकेमुळे ते देशभरातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले.

विशेष म्हणजे ‘मालगुडी डेज’चं दिग्दर्शन त्यांचे धाकटे बंधू शंकर नाग यांनी केलं होतं. अनंत नाग आणि शंकर नाग या बंधूंनी कन्नड चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

‘KGF’मधील आनंद इंगलागीची भूमिका

आजच्या पिढीतील प्रेक्षक अनंत नाग यांना ‘KGF: Chapter 1’मधील आनंद इंगलागी या भूमिकेसाठीही ओळखतात. चित्रपटात त्यांनी पत्रकार आणि लेखकाची भूमिका साकारली होती. कथानक सांगण्याची त्यांची शैली आणि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

याशिवाय अनंत नाग यांनी अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भीष्मा’ या चित्रपटातही काम केलं आहे.

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय

अनंत नाग यांनी अभिनयासोबतच राजकारणातही प्रवेश केला होता. ते कर्नाटक सरकारमध्ये बेंगळुरू शहरी विकास मंत्री म्हणून कार्यरत होते. याशिवाय ते कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आणि आमदारही राहिले आहेत.

अनेक पुरस्कारांनी गौरव

अनंत नाग यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्यांना पद्म भूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या नावावर सहा फिल्मफेअर पुरस्कार असून त्यांनी पाच वेळा कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार मिळवला आहे.

आता भारतीय सिनेमातील पाच दशकांहून अधिक काळाच्या योगदानाची दखल घेत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ आणि बहुआयामी कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!

Web Title: Anant nag dadasaheb phalke award kgf malgudi days career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • dadasaheb phalke awards
  • Entertainement News
  • south actors

संबंधित बातम्या

Rahul Vaidya Classy Home: घर असावं तर राहुल वैद्यसारखं! व्हाईट थीमने जिंकली मनं, झोपाळ्याने वेधलं लक्ष
1

Rahul Vaidya Classy Home: घर असावं तर राहुल वैद्यसारखं! व्हाईट थीमने जिंकली मनं, झोपाळ्याने वेधलं लक्ष

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाडचे दिग्दर्शनात पदार्पण, ‘F.I.R. NO. 469’मधून मांडणार कॉमन मॅनची गोष्ट
2

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाडचे दिग्दर्शनात पदार्पण, ‘F.I.R. NO. 469’मधून मांडणार कॉमन मॅनची गोष्ट

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?
3

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
4

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.