अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलची मुख्य भुमिका असलेला गदर 2 (Gadar 2) चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. यामध्ये सनी देओल साकारलेली तारा सिंगची भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं. त्यानंतर प्रेक्षकांना गदर 3 (Gadar 3 ) ची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार असून गदर फ्रँचायझीच्या निर्मात्यांनीही गदर-3 (Gadar 3) बनवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच तारा सिंगची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
[read_also content=”बॅालिवुडमधील आणखी एक कपल अडकणार लग्नबंधनात, रकुल प्रीत सिंग जॅकी भगनानीचं ‘या’ दिवशी गोव्यात लग्न! https://www.navarashtra.com/movies/rakul-preet-singh-and-jackky-bhagnani-may-tie-knot-on-21-february-in-goa-nrps-499791.html”]
पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, गदर आणि गदर 2 चं दिग्दर्शन करणाऱ्या अनिल शर्मा यांनी गदर 3 बनवण्याच्या चर्चांना शिक्कामोर्तब केलं आहे. त्याची कथाही तयार झाली आहे. पिंक व्हिलाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, झी स्टुडिओ, अनिल शर्मा आणि सनी देओल यांच्यातील पेपरवर्कही पूर्ण झाले आहे. गदर-2 रिलीज झाल्यानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांची टीमही गदर-3 बनवण्याच्या विचारात होती.
गदर 3 हा चित्रपटही भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आणि धमाकेदार असेल असे निर्मात्यांनी सांगितले आहे. यामध्येही जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होऊ शक्यता आहे.कारण अनिल शर्मा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जर्नी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.






