
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Asim Riaz vs Vishal Aditya Singh:गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आणि ‘बिग बॉस’मधील माजी स्पर्धक असीम रियाझ (Asim Riaz) आणि विशाल आदित्य सिंग (Vishal Aditya Singh) यांच्यात सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. दोघेही सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. हिमांशी खुरानासोबतच्या नात्यावरून विशालने केलेल्या वक्तव्यानंतर असीमने त्याच्यावर टीका केली होती. आता विशालनेही असीमला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
विशाल आदित्य सिंगची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने असीमच्या ‘बिग बॉस’मधील ओळखीवरून त्याला टोला लगावला.
विशालने लिहिलं, “एक्स बिग बॉस कंटेस्टंट, बस हीच तुझी ओळख आहे आणि हीच राहणार. तर असीम भाई, प्लीज कीप क्लम आणि बोलो जय श्री राम.”
यानंतर विशालने असीमच्या मानसिक आरोग्याविषयी केलेल्या वक्तव्यावरही उपरोधिक भाष्य केलं. “मानसोपचारतज्ज्ञाचा नंबर आठवणीने पाठव. मी तुला सुरेश वाडकर म्युझिक स्कूलचा नंबर पाठवतो आणि एक जिमचं कूपनही पाठवतो. इंजेक्शनने फक्त बॉडी बनते… दिमागसाठी पण काहीतरी बघ,” असं त्याने म्हटलं.
असीम रियाझनेही केली होती पोस्ट
विशालच्या पोस्टपूर्वी असीम रियाझने एक्सवरून त्याच्यावर निशाणा साधला होता. असीमने लिहिलं, “विशाल, राष्ट्रीय टीव्हीवर तुझ्या एक्स-गर्लफ्रेंडकडून पॅनने मार खाल्ल्यामुळे तुला कायमस्वरूपी इजा झाली आहे. सगळीकडे माझं नाव वापरणं थांबव. जर तुला माझं लक्ष हवं असेल, तर पॉडकास्ट आणि मीडियामध्ये हलक्या दर्जाच्या टिप्पण्या करण्याऐवजी मला डीएम कर.”
पुढे असीमने विशालला मानसोपचारतज्ज्ञ शोधून देण्याचाही टोला लगावला. “काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन,” असं त्याने म्हटलं.
Vishal, getting beaten with a pan on national TV by your ex GF left some permanent damage. Stop chanting my name everywhere. If you need my attention, DM me instead of being a ScumBAG on podcasts and in the media. Don’t worry, I’ll try my best to find a psychiatrist for you. — Asim Riaz (@imrealasim) September 2, 2026
विशाल आदित्य सिंगने एका मुलाखतीत हिमांशी खुरानाच्या असीम रियाझसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केल्यानंतर हा वाद अधिक चिघळला. हिमांशीने त्यांच्या नात्यादरम्यान असीमकडून धर्मांतराचा दबाव असल्याचा दावा केल्याचं सांगितलं जात आहे.
‘फिल्म विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत विशाल म्हणाला की, त्याने संपूर्ण पॉडकास्ट ऐकलेला नाही. मात्र, नात्यात दोन्ही बाजूंकडून चुका झाल्या असण्याची शक्यता त्याने व्यक्त केली.
“दोन्ही बाजू बरोबर असू शकतात. दोघांनीही कुठेतरी काहीतरी चूक केली असेलच. तिने काहीतरी म्हटलं असेल, त्याने काहीतरी म्हटलं असेल,” असं विशालने म्हटलं.
पुढे तो म्हणाला, “जर ती म्हणत असेल की त्यांच्या विभक्त होण्याचं कारण म्हणजे त्याला तिचं धर्मांतर करायचं होतं, तर तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच माहित होतं की तो मुस्लिम होता. त्यामुळे तुम्ही पहिल्याच दिवशी हे स्पष्ट करायला हवं होतं. मी हिमांशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीये. मी फक्त सावधगिरी बाळगायला सांगत आहे.”
दरम्यान, या वक्तव्यानंतर असीम आणि विशाल यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरू झालं असून, दोघांच्या पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.