Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

Bakaiti Season 2: क्राईम आणि थ्रिलर वेबसीरिजपासून ब्रेक घेऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘बकैती सीजन 2’ मनोरंजनाची नवी मेजवानी घेऊन येत आहे. ZEE5 ने या लोकप्रिय शोचा ट्रेलर रिलीज केला असून कटारिया फॅमिली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 19, 2026 | 02:17 PM
Bakaiti Season 2: 'बकैती सीजन 2' टेलर प्रदर्शित(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bakaiti Season 2: 'बकैती सीजन 2' टेलर प्रदर्शित(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

सध्या OTT वर एकाच टाईपच्या क्राईम आणि थ्रिलर वेबसिरीज पाहून कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. सगळ्यांची लाडकी कटारिया फॅमिली पुन्हा येत आहे. ZEE5 ने आपल्या सुपरहिट शो ‘बकैती सीजन 2’ चा ट्रेलर रिलीज केला असून ट्रेलर पाहूनच हसून हसून पोट दुखायला लागलंय. हा नवा सीजन 25 सप्टेंबर 2026 पासून हिंदी ZEE5 वर पाहायला मिळेल. Bakaiti Season 2

पहिल्या सीजनला एवढं प्रेम का मिळालं?

पहिला सीजन प्रेक्षकांना एवढा का आवडला? कारण त्यात आपल्या घरचीच गोष्ट होती. मध्यमवर्गीय कुटुंब, रोजचे वाद, आईचा ओरडा, बाबांचं टेन्शन, भावंडांची भांडणं हे सगळं प्रत्येकाच्या घरात घडतं. त्यामुळे लोकांना कटारिया फॅमिली आपलीच वाटली होती. त्याच यशानंतर आता मेकर्स दुसरा सीजन घेऊन आले आहेत आणि यावेळी धमाका डबल आहे.

सीजन 2 मध्ये काय होणार?

ट्रेलरवरून गोष्ट थोडी समजते. पहिल्या सीजननंतर जवळपास एक वर्ष झालं आहे. आता एका अनपेक्षित घटनेमुळे अजय, अल्का आणि अमन परत कटारिया कुटीरमध्ये राहायला येतात. म्हणजे आता दोन्ही कटारिया फॅमिली एकाच घरात राहणार. जिथे दोन फॅमिली एकत्र येतात तिथे गोंधळ होणारच. सुरुवातीला ही तात्पुरती व्यवस्था वाटते, पण नंतर त्याचा मोठा वाद होतो. वेगवेगळी मतं, दुखावलेला इगो, जुन्या भांडणांचा हिशोब आणि रोजचे किचकिच. घरात सतत बकैती सुरू असते.

पण या हसण्या खेळण्यामागे एक इमोशनल गोष्ट सुद्धा आहे. कुटुंबावर पैशाचा दबाव आहे, नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नानाजींची तब्येत ठीक नाही, त्यांची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. अशातच कटारिया कुटीर विकून तिथे नवीन बिल्डिंग बांधण्याचा विषय येतो. आता हे घर फक्त घर राहत नाही, तर इमोशन बनतं. घर म्हणजे नक्की काय? हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. या सगळ्या गोंधळात भरडला जातो तो संजय कटारिया. त्याला एका संकटातून दुसऱ्या संकटातून वाट काढावी लागते.

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

कलाकार कोण आहेत?

या सीजनमध्ये पण जुनीच टीम आहे. डाईस मीडिया ने हा शो बनवला आहे आणि समर इक्बाल यांनी दिग्दर्शन केलं आहे. राजेश तैलंग, शीबा चड्ढा, तान्या शर्मा आणि आदित्य शुक्ला हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत देविशी मदान, रित्विक नाम्बियार आणि अशोक चव्हाण पण दिसणार आहेत.

सीजन 2 वेगळा कसा आहे?

मेकर्सचं म्हणणं आहे की यावेळी बकैती डबल आहे. कारण फॅमिली पण डबल झाली आहे. एकाच छताखाली दोन कुटुंब, त्यामुळे डबल वाद इमोशन सुद्धा पाहायला मिळणार आहे. हा शो फक्त विनोद नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर आहे. पैसा, भावंडांचं नातं, आई वडिलांचं टेन्शन, पिढ्यांमधला फरक या सगळ्यावर हा शो बोलतो.

दिग्दर्शक समर इक्बाल म्हणाले की, “बकैती हे माझ्या खूप जवळचं जग आहे. जिथे कोणी डायरेक्ट I Love You म्हणत नाही, पण जेवण झालं का? हे नक्की विचारतात. हाच गोंधळ आणि आपुलकी कटारिया फॅमिलीला खास बनवते. सीजन 2 मध्ये आम्ही पात्रांच्या इमोशनवर जास्त काम केलं आहे.”

Jahnavi Killekar On Trollers: ‘नवरा विकला का काय?’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं सडेतोड उत्तर; VIDEO व्हायरल

राजेश तैलंग आणि शीबा चड्ढा यांनी पण सांगितलं की या शो मध्ये परत येऊन खूप छान वाटतंय. प्रेक्षकांनी पहिल्या सीजनला एवढं प्रेम दिलं, त्यामुळे दुसऱ्या सीजनची जबाबदारी वाढली आहे.जर तुम्हाला फॅमिली ड्रामा, कॉमेडी आणि इमोशनल शो आवडत असेल तर ‘बकैती सीजन 2’ तुमच्यासाठीच आहे. 25 सप्टेंबरला ZEE5 वर पाहायला विसरू नका. कटारिया कुटीरमध्ये पुन्हा एकदा गोंधळ सुरू होणार आहे.

Web Title: Bakaiti season 2 zee5 trailer release date kataria family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi movie
  • Navrashtra

संबंधित बातम्या

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित
1

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित

Jahnavi Killekar On Trollers: ‘नवरा विकला का काय?’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं सडेतोड उत्तर; VIDEO व्हायरल
2

Jahnavi Killekar On Trollers: ‘नवरा विकला का काय?’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं सडेतोड उत्तर; VIDEO व्हायरल

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने गोरेगावमधील घर विकलं? किंमत ऐकून व्हाल थक्क!
3

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने गोरेगावमधील घर विकलं? किंमत ऐकून व्हाल थक्क!

Vettuvam Movie: भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!
4

Vettuvam Movie: भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.